शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

मुरुमाचे अवैध उत्खनन

By admin | Updated: June 7, 2014 23:45 IST

खापा-विहीरगाव मार्गावर विईरगाव शिवारात मुरूमाचे नियमबाह्य सर्रास अवैध उत्खनन दिवसाढवळ्या मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शासनाच्या लाखोंचा महसूल येथे बुडत असताना महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

तुमसर : खापा-विहीरगाव मार्गावर विईरगाव शिवारात मुरूमाचे नियमबाह्य सर्रास अवैध उत्खनन दिवसाढवळ्या मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शासनाच्या लाखोंचा महसूल येथे बुडत असताना महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तुसमर-भंडारा राज्य मार्गाजवळून खापाकडून विहीरगावकडे रस्ता जातो. विहीरगाव शिवारात रस्त्याशेजारील नियमबाह्य सर्रास मुरूमाचे अवैध उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. येथे उत्खननामुळे मोठे खड्डे पडले आहेत. शासनाची येथे लिज नाही. उत्खनन सुरू आहे मुरूम असलेल्या जागेकडे मुरूम उत्खनन करणार्‍या माफियांची नजर असते. अनेक ठिकाणी असे अवैध उत्खनन या माफियांनी केले असून आजही सर्रास उत्खनन करणे सुरू आहे. मुरूम उत्खनन करण्याची परवानगी नियमानुसार तहसील कार्यालयाकडून घ्यावी लागते. तत्पूर्वी तलाठी, मंडळ अधिकार्‍यांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. महसूल प्रशासन शेवटच्या टोकापर्यंत नियुक्त केला आहे, परंतु हे प्रशासन केवळ येथे नावापुरतेच दिसून येते.अनेक ठिकाणी तलाव परिसरात, शासकीय पडीक जमिनी, गावाबाहेरील खडकाळ जमिनीतून अवैध मुरूम उत्खननाला येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून सुरूवात होते ते जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरूच असते. येथे सर्रास सहा महिने मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू असते. यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडतो, परंतु महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकार्‍यांनी आतापर्यंत कुणावरही ठत्तेस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. तुमसर येथे नव्याने रूजू झालेले तहसीलदारांनी आल्या आल्या अवैध रेती वाहतुकीवर व चोरीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. नवीन अधिकार्‍यांचा तो शिरस्ताच मानला जातो. तालुक्यात धाक निर्माण करणे हा त्यातील एक भाग आहे, परंतु त्यानंतर मात्र सर्व गप्प दिसत आहेत.काय आहे नियम?अवैध मुरूम उत्खनन करणे, चोरी करणे, रती उत्खनन व चोरी करणे, तिची वाहतूक करणे याप्रकरणी फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात आहे, परंतु असा फौजदारी गुन्हा कुणीच नोंदवीत नाही. ओव्हरलोड रेती वाहतूक करणार्‍यावर केवळ क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेल्याप्रकरणी दंड आकारला जातो. परंतु क्षमतेपेक्षा रेती वाहून नेणार्‍यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे तसा कायदा आहे, परंतु तसे होतानी दिसत नाही. पुन्हा राजरोसपणे तशीच वाहतूक सुरू राहते. जिल्हाधिकार्‍यांनी रेती वाहून नेणार्‍या ट्रकवर कारवाईचे आदेश दिले आहेत, परंतु तुमसर-भंडारा-तुमसर-रामटेक मार्गावरून दररोज सकाळी ५.३0 ते ७ दरम्यान सुमारे ६0 ते ७0 ट्रक रेती वाहून नेत आहेत. तिरोडा येथील रेतीघाटावरील हे ट्रक असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)