शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाचे अवैध उत्खनन वाढले

By admin | Updated: December 30, 2014 23:28 IST

तहसीलदार पवनी तसेच महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी दिवसरात्र अवैध मुरुम, रेती उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करीत आहेत. तरी देखिल रात्री अवैधपणे रेतीचे उत्खनन करून वाहतूक

कोंढा कोसरा : तहसीलदार पवनी तसेच महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी दिवसरात्र अवैध मुरुम, रेती उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करीत आहेत. तरी देखिल रात्री अवैधपणे रेतीचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याने अनेकांनी कोंढा परिसरात अवैध वाहतूक करणारे ट्रक्टर पाहिले, पण त्यांचा क्रमांक भितीमुळे सांगण्यास नकार दिला.पवनी तालुक्यात अवैधपणे रेती तस्कर उत्खनन करून विकत आहेत. रेती उत्खनन करण्यासाठी जेसीबी मशिनचा वापर करीत असतात. रात्रभर नदीच्या घाटातील रेती उपसले जाते. त्यानंतर रात्रीला अवैध चोरटी रेतीची वाहतूक होत असते. महसूल विभागाने पुन्हा दक्ष राहून पोलीसाच्या सहकार्याने अवैध रेती उत्खनन थांबवून शासनाचे महसूल वाचविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.कोंढा परिसरात गौण खनिजामध्ये सर्वत्र मुरुम आढळते. त्याची सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोंढा गावाजवळील चुऱ्हाड नर्सरी आहे. नर्सरी लगत वनविभागाची खाली जागा आहे. तेथे रात्रीला जेसीबी मशीनद्वारे मुरुमाचे उत्खनन झाल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले आहे. येथे रात्रीला हे उत्खनन होत असल्याने नागरिकांच्या लक्षात आले नाही. दि. २७ डिसेंबर २०१४ ला चुऱ्हाड नर्सरी येथील हनुमंताच्या मंदीरात महाप्रसादाचा कार्यक्रम होता. त्यासाठी अनेक गावचे आजूबाजूचे लोक महाप्रसादासाठी गेले तेव्हा मंदिराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सरकारी जागेत मोठमोठे खड्डे खोदले लोकांना दिसले. मुरुम अवैधपणे उत्खनन झाल्याचे लोकांनी सांगितले. १५ फुट खोल १० ते १५ हे.आर. जागेत अवैध उत्खनन केले आहे. यासाठी जेसीबी मशिनचा वापर केला असे लोकांनी सांगितले. महसूल विभागाकडून गौण खनिजाची परवाणगी सहजासहजी मिळत नाही. काही कंत्राटदार अवैधपणे कोणाला माहीती होऊ नये यासाठी रात्री जे.सी.बी. द्वारे मुरुमाचे उत्खनन करतात. यासाठी ते महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरत असावे असे बोलले जात आहे. उत्खननामुळे सरकारी जागेत मोठमोठे बोळी, तलाव तयार झाले आहेत. अजून याकडे दुर्लक्ष झाल्यास शासनाच्या करोडो रुपयाचा महसूल बुधणार आहे. महसूल विभागाने दक्ष राहुन अवैध रेती, मुरुम उत्खनन बंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)