शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडकुंभली टेकडीवर खनिजांचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:40 IST

तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने नटलेला असून तालुक्यात पहाडी, झाडे, तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तस्करांच्या उपद्रवामुळे पहाड्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहेत.

ठळक मुद्देवन व महसूल विभागाचे दुर्लक्ष : शासनाला दररोज लाखो रुपयाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने नटलेला असून तालुक्यात पहाडी, झाडे, तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तस्करांच्या उपद्रवामुळे पहाड्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहेत. साकोलीपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या गडकुंभली पहाडीवर दररोज अवैधरित्या मुरुम व गिट्टीचे राजरोसपणे उत्खनन सुरु आहे. मात्र याकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे.वनविभाग व महसूल विभाग यांची संयुक्त अशी गडकुंभली येथे पहाडी आहे. या पहाडीवर महादेवाचे मंदिर असून पहाडीच्या पायथ्याजवळ गडकुंभली हे गाव वसले आहे. मात्र दोन्ही बाजूने दररज हजारो ब्रास मुरुम व गिट्टीचे दररोज अवैधरित्या खनन होत आहे. यामुळे गावाला व पहाडीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध खननाची चौकशी करून ज्या अधिकाºयांनी या अवैध खननाकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आहे.