शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ऊसापासून अवैध मद्यनिर्मिती

By admin | Updated: January 23, 2017 00:23 IST

तालुक्यातील ग्रामीण परिसरातील मोहफुलापासून मद्यनिर्मिती केली जाते. आता दारू विक्रेत्यांनी नवीन दारूचा प्रकार शोधून काढला आहे.

तळीरामांच्या जीवाला धोका : तुमसर तालुक्यातील प्रकार, मध्यप्रदेशातील टोळी तालुक्यात दाखलमोहन भोयर तुमसरतालुक्यातील ग्रामीण परिसरातील मोहफुलापासून मद्यनिर्मिती केली जाते. आता दारू विक्रेत्यांनी नवीन दारूचा प्रकार शोधून काढला आहे. गुळापासून नियमबाह्यपणे मद्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात तालुक्यात सुरु आहे. मद्यनिर्मिती करताना रासायनिक पदार्थांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे तळीरामांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून हा धक्कादायक प्रकार सर्रास सुरु आहे.तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात गुळापासून मद्यनिर्मिती सर्रास सुरु आहे. नाकाडोंगरीपासून मध्यप्रदेशाच्या सीमा सुरु होते. मध्यप्रदेशात गुळापासून मद्यनिर्मिती केली जाते. मध्यप्रदेशातील मद्यनिर्मिती करणारे सध्या तुमसर तालुक्यात शिरकाव केला आहे. मोहफुलांचा तुटवडा आहे. सध्या उस पिकांची प्रचंड आवक वाढली आहे. कारखान्यात ऊस विक्री केल्यावर तात्काळ रक्कम मिळत नाही. तथा ये जा करण्यात मोठा वेळ लागतो. त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांकडून मद्यनिर्मिती करणारे नगदी ऊस पिक खरेदी करीत आहेत.शेतकऱ्यांना ऊसाच्या नगदी मोबदला दिला जात असल्याने दलालामार्फत ऊस विक्री सुरु आहे. ऊसाच्या सडविण्यात येते. सडविण्याकरिता मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य व पदार्थांचा वापर केला जात आहे. प्रमाण नसल्याने दारु विषारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दारुला भाव जास्त मिळतो. तळीरामांची ती पहिली पसंती ठरत आहे. लवकर व किंमत देणारी दारु म्हणून ती प्रसिद्ध पावत आहे. सध्या या दारुला मोठी मागणी असल्याची आहे. यापूर्वी नाकाडोंगरी, आष्टी, लोभी, पात्री, कवलेवाडासह परिसरात ऊसापासून मोठ्या प्रमाणात गुळ तयार करणारे गुऱ्हाळ सुरु होते. आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. गुऱ्हाळात गुळ तयार करायला मोठ्या अडचणी आहेत. बाजारात गुळाला भाव नाही. विक्रीकरिता परप्रांतात विक्री करावी लागते. त्यामुळे गुऱ्हाळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत.दुसरीकडे मद्यनिर्मितीकरिता ऊसाचा वापर सुरु झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी नगदी ऊसाची विक्री येथे करीत आहे. ऊस कुठे जातो ते त्यांना माहिती नाही ही विशेष. पोलीस प्रशासन येथे मुग गिळून गप्प आहे. परिसरात मात्र दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. एकमात्र खरे ऊसाला येथे चांगला भाव मिळत आहे.