शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करून मुरूमाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाच्या उपजिल्हा जलसंधारण अधिकारी भगत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला मुरूम उत्खननाची परवानगी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. या परवानगीची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना नाही. तहसीलदार यांनाही तलावात होत असलेल्या उत्खननाची माहिती नसून, अशी कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भंडारा -पवनी मार्गावरील तलावांत मातीचे ढिगारे, लघु पाटबंधारे विभागाचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पवनी-भंडारा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर वापरण्यात येत असलेल्या मुरूमाचे अवैध उत्खनन केले जात आहेत. या नियमांना तिलांजली देवून कंत्राटदार शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडीत आहे. याकडे परवानगी दिलेल्या जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. संबंधित कंपनीला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी एका शिष्टमंळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पवनी-भंडारा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सबंधित कंत्राट कंपनीने महामार्गालगतच्या गावांमधील अनेक तलावांमधून मुरूम व मातीचे उत्खनन केले जात आहे. काही तलाव मालगुजारी, तर काही तलाव जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार क्षेत्रातील आहेत.जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाच्या उपजिल्हा जलसंधारण अधिकारी भगत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला मुरूम उत्खननाची परवानगी दिल्याची बाब उघडकीस आली आहे. या परवानगीची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना नाही. तहसीलदार यांनाही तलावात होत असलेल्या उत्खननाची माहिती नसून, अशी कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले जाते.तलावातून मुरूम, माती, गाळ काढले जातात. मात्र सदर कंपनीकडून मुरूमच काढला जात आहे. मुरूम आहे तिथेच खोदकाम केले जात आहे. संबंधित कंत्राट कंपनीने पाहिजेपेक्षा जास्त खोल १५ ते २० फूट खड्डे तलावात पाडले आहेत.तलावाचे खोलीकरण करण्याऐवजी तलावाचे विद्रुपीकरण करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे वन्यप्राणी व नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २५ पेक्षा अधिक तलावातून नियमांना डावलून उत्खनन सुरू आहे. उत्खननामुळे शेतकºयांना सिंचनाची सोय होणे कठीण झाले आहे. परीणामी अपघताची शक्यता वर्तविण्यात आली आहे.निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, अनिल कडव, बालू ठवकर, स्वप्निल आरीकर, किरण चवळे, राजेश इसापुरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प