फलक लावले : आदेशाची अंमलबजावणी होणार?तुमसर : अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसून एसटीला नियमित महसूल मिळावा, तोट्यातील एसटी फायद्यात यावी, याकरिता तुमसरात बसस्थानक परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत अवैध प्रवासी वाहतुकीला बंदीचा फलक शुक्रवारी लावण्यात आला असला तरी केवळ आदेशाचे पालन एसटीकडून केले जात आहे.एस.टी. महामंडळ मागील काही वर्षापासून तोट्यात आहे. प्रत्येक बसस्थानक परिसरापासून २०० मीटर अंतरावर प्रवासी वाहने ठेवता येणार नाही, असा नियम आहे. परंतु जिल्ह्यातील सर्वच परिसरापासून मेन रोडवर वाहने असतात. तुमसरात युनिक सेंटरजवळ व भंडारा रोडवर देव्हाडी बायपास रस्त्याजवळ ‘नो पार्किंग’ झोनचा फलक शुक्रवारी लावण्यात आला आहे. तुमसर-भंडारा, तुमसर-रामटेक, तुमसर-बपेरा, तुमसर-नाकाडोंगरी मार्गावर अवैध प्रवासी वाहने मोठ्या संख्येने धावतात. यातील काही वाहनांना प्रवाशी वाहतुकीचा परवाना आहे, पंरतु यापैकी अनेक वाहने अवैध धावत आहेत. बसस्थानक परिसरात या वाहनांचा ठिय्या राहायचा त्यामुळे एसटीचे प्रवाशी अवैध प्रवासी वाहनातून प्रवास करायचे. एसटी महामंडळाने येथे नविन निर्देश व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक आगार व्यवस्थापकांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवैध प्रवासी वाहनांना ‘नो एंट्री’
By admin | Updated: January 17, 2016 00:34 IST