शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत बेकायदेशीर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 22:06 IST

नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या तकीया वॉर्डातील औद्योगिक वसाहतीत बेकायदेशिररित्या सुरु असलेले बांधकाम त्वरीत बंद करण्याचे आदेश नगरपरिषदेस देण्यात आले. मात्र भंडारा इंडस्ट्रीयल को-आॅप इस्टेटच्या अध्यक्षतेत या पत्राला केराची टोपली दाखविल्याने नगरपरिषदेने फौजदारी कार्यवाही करण्याचा आदेश बजावला आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : नगरपरिषदेच्या पत्राला दाखविली केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या तकीया वॉर्डातील औद्योगिक वसाहतीत बेकायदेशिररित्या सुरु असलेले बांधकाम त्वरीत बंद करण्याचे आदेश नगरपरिषदेस देण्यात आले. मात्र भंडारा इंडस्ट्रीयल को-आॅप इस्टेटच्या अध्यक्षतेत या पत्राला केराची टोपली दाखविल्याने नगरपरिषदेने फौजदारी कार्यवाही करण्याचा आदेश बजावला आहे.भंडारा शहरातील तकीया वॉर्डात उद्योगांसाठी औद्योगिक वसाहत गत अनेक वर्षापासून आहे. या ठिकाणी काही कंपन्या आजही सुरु आहेत. मात्र येथील पदाधिकाऱ्यांनी या वसाहतीतील खुल्या जागेचा गैरवापर सुरु केला आहे. या औद्योगिक वसाहतीतील गट क्र. १२६७ ही जागा वसाहतीच्या सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र या जागेवर भंडारा इंडस्ट्रीयल को आॅप इस्टेटच्या पदाधिकाºयांनी दुकानाच्या चाळी काढून त्या किरायाने दिल्या. यात भरपूर नफा असल्याने औद्योगिक वसाहतीच्या अध्यक्षांनी भंडारा नगरपरिषदेला पुन्हा नव्या सात दुकानासाठी प्रस्ताव दिला. सात दुकानांचा प्रस्ताव असताना प्रत्यक्षात १५ दुकानांचे बांधकाम सुरु करण्यात आले. बांधकाम आराखड्यानुसार पूर्व व दक्षिण बाजूस जागा सोडणे आवश्यक असताना त्याही ठिकाणी बांधकाम सुरु करण्यात आले.या बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या बांधकामाची तक्रार नगरसेविका कल्पना व्यास तसेच माजी नगरसेवक राजू व्यास यांनी नगरपरिषद भंडारा, औद्योगिक आयुक्त मुंबई, उपसंचालक नगररचना विभाग नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा, नगररचना कार्यालय भंडारा यांचेकडे केली. नगरपरिषदेद्वारा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढळल्याने प्रत्यक्षात घटनास्थळी जावून पंचनामा करण्यात आला. यात प्रत्यक्षात परवानगीपेक्षा जास्त दुकानांचे गाळे बांधकाम सुरु असल्याचे तसेच नकाशाप्रमाणे काम सुरु नसल्याचे, जागा न सोडल्याचे आढळून आले. यापूर्वीच सदर बांधकाम बंद करण्याचे आदेश नगरपरिषदेने पत्राद्वारे दिले होते. पण बांधकाम सुरु होते. शेवटी याबाबत सातत्याने व्यास यांनी पाठपुरावा केल्याने ५ आॅगस्टला नगरपरिषदेने औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सुनील रंभाड यांना पत्र देवून यानंतर कोणतेही बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ कलम ५२, ५३, ५४ अन्वये कार्यवाही करण्याचे व फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना दंडीत करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका कल्पना व्यास व राजू व्यास यांनी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नगरपरिषदने ठरवून दिलेल्या नियमानुसार बांधकाम करण्यात आले. आरोपकर्त्यांनी इंडस्ट्रीयल जागेवर अतिक्रमण केलेले असल्यामुळे ते अतिक्रमण हटू नये म्हणून बिनबुडाचे आरोप केले आहेत. प्रशासनावर दबाव आणला जात आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने मोठा कर नगरपरिषदेला भरण्यात येते. मात्र येथील विकास कामे करण्यास पालिकेकडून टाळाटाळ होत असते. विकासाकडे लक्ष न देता काही नगरसेवकांच्या दबावामुळे उलटसुलट प्रकार केले जात आहेत.-सुनील रंभाड, अध्यक्ष, भंडारा इंडस्ट्रीयल को आॅप. इस्टेट, भंडारा