शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यावसायिकांकडून ४४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:16 IST

जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने केले.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने केले.जुगार कायद्याखाली पोलीस स्टेशन भंडारा व लाखनी येथे ३ गुन्हे नोंद केले असुन आरोपीतांकडून एकूण ३,९१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच पोलीस स्टेशन सिहोरा आणि लाखनी येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली एकूण चार गुन्हे नोंद केलेले आहेत.एकूण १ लक्ष ७ हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे रेतीची अवैध वाहतूक करणाया दोन ट्रक चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन २० लक्ष ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.तसेच पोलीस स्टेशन कारधा व लाखनी येथे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन २३ लक्ष ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाने अवैध व्यवसायिकांविरुद्ध कारवाई करुन एकूण ४४ लक्ष ८७ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.त्याचप्रमाणे भंडारा येथे गांजा विक्री करणारा नामे जाकीर शेख रा. बैरागी वाडा याचे विरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे एन. डी. पी. एस. कायदयाविरुध्द गुन्हा नोंद करुन त्यास अटक केलेली आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सपोनि काळे, पोटे, पोलीस उपनिरीक्षक आडोळे आणि त्यांच्या पथकाने केली.माहिती देण्याऱ्यांचे नाव ठेवणार गोपनीयजिल्ह्यात लपुनछपुन सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबतची माहिती नियंत्रण कक्ष भंडारा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला देण्याबाबत पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी जनतेला आवाहन केले असुन माहिती देणाºयांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.