गोबरवाही : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव व आवश्यक सुविधा मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. विभागाने याकडे लक्ष घालून समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी केल्या जात आहे. गोबरवाही परिसराचा व्याप बघता १९६२ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. त्यापूर्वी अँलोपॅथीक दवाखाना सुरु होता. प्राथमिक आरोग्य केंद्र उभी असलेली जागा गोबरवाही येथील मालगुजार रायसाहब अग्रवाल यांनी नागरिकांच्या आरोग्याची स्थानिक ठिकाणी काळजी घेतली जावीया उद्देशाने दान केली. परंतु आज घडीला केंद्रामध्ये एक्स रे मशीन व शव विच्छेदनाची सुविधा उपलब्ध नाही.य ा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सीतासावंगी, चिचोली, मिटेवानी, मोहगाव खदान, येरली, मेहगाव व गोबरवाही या उपकेंद्राचा समावेश असून ३३३७५ हजार लोकांचे आरोग्याची जबाबदारी या केंद्रावर असून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३७ गावांचा समावेश आहे. तुमसर पंचायत समिती चे प्रथम सभापती मोहनलाल गोयनकाच्या प्रयत्नांनी तुमसर तालुक्यात प्रथम आरोग्य केंदन्र गोबरवाही येथे सुरु करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाला दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय बनविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून अजूनपर्यंत प्रलंबित आहे. गोबरवाही परिसरातील बहुसंख्य जनता आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. आदिवासी हे जंगलव्याप्त क्षेत्रात राहतात. मॅगनीज खाण कामगार व बिडी कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी असते. येथील आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. गोबरवाही आरोग्य केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून एक स्टॉप नर्स, एक एम.पी.डब्लू., एक ए.एन.एम. एक परिचर, एक स्वीपर असे एकुण पाच पद रिक्त आहेत. आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समितीने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
गोबरवाही आरोग्य केंद्र उपेक्षित
By admin | Updated: May 27, 2014 00:37 IST