शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नवोदयच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:41 IST

१७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत पालकांचा आरोप : मोहाडी येथे विद्यार्थी नेवूनही समस्या मात्र कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.पालक म्हणाले, २३ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने बघेल, अशी आशा होती. पालकांनीही या आंदोलनासाठी खूप संघर्ष केले. विशेष म्हणजे नवोदय विद्यालय माविमं इमारतीत पोलीस बंदोबस्तात हलविले याचे नेमके कारण अजुनपर्यंत पालक व संघर्ष समितीला कळले नाही. स्थानांतरणाच्या वेळी या इमारतीत पूर्ण सोयीसुविधा आहेत काय, अशी विचारणा जिल्हा प्रशासनासह मुख्याध्यापक अंबोरे यांना विचारण्यात आले होते. या इमारतीच्या सभोवतालचा परिसर स्वत: पालकांनी पुढाकार घेवून स्वच्छ केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना समस्याबाबत तीन वेळा निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाºयांसोबत चर्चाही करण्यात आली. मात्र पालकांच्या पदरी निराशाच पडली. यावर्षी मुलांना शालेय गणवेश व जोडे मिळालेले नाहीत. मुलांची आरोग्य तपासणीही झालेली नाही. मुलांच्या कक्षामध्ये पुरूष शिक्षका ऐवजी महिला शिक्षकाची नियुक्ती आहे. दीड वर्षांपासून मुख्याध्यापकांनी शालेय समिती स्थापन केली नाही. माविमंच्या इमारत परिसरात महिनाभरात चार विषारी सापही निघाले. स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय व संगणक कक्षाची सोय अजुनपर्यंत झालेली नाही. २२ विद्यार्थ्यांसाठी दोन शौचालय व तीन स्रानगृह आहे. आंघोळीकरिता गरम पाण्याची सोय लवकर करण्यात येईल ही मागणीही अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी सदर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शाप की वरदान, असा टोलाही यावेळी पालकांनी लवला.पत्रकार परिषदेला भाऊ कातोरे, उमेश मोहतुरे, भगवान ढेंगे, प्रवीण उदापुरे, यशवंत भोयर, रोहित साठवणे, संजय मते, शशिकांत गजभिये, यशवंत टिचकुले, उषा कातोरे, शालिनी झोडे, विलास मोथरकर, योगिता लांजेवार, मंगेश वंजारी यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.