शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पाणी शुद्धीकरणाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By admin | Updated: June 15, 2014 23:24 IST

तालुक्यातील चिचटोला येथे जलजन्य आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून सात रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लाखनी : तालुक्यातील चिचटोला येथे जलजन्य आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून सात रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.हगवण, उलटी, ताप असलेले २२ रुग्ण आढळून आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मोटघरे, डॉ.डी.डी. अंबादे, डॉ.अशोक चोले व आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावाचे सर्व्हेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यात.चिचटोला येथे खंडविकास अधिकारी हेमंत मेहर यंनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतांचे ब्लिचिंगद्वारे शुद्धीकरण करण्याबाबत निर्देश दिले. पिण्याच्या पाण्याचे नियमित व प्रमाणशीर शुद्धीकरण करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला तंबी दिली.गावातील सर्व पिण्याचे पाण्याचे स्त्रोतांचे शुद्धीकरण ग्रामपंचायतने नियमित करावे व ब्लिचिंगचा तीन महिनेपर्यंत पुरेल एवढा साठा ठेवण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मोटघरे यांनी दिले आहे. गावालतच खतांचे खड्डे नसावे, प्रत्येक वॉर्डात स्वच्छता मोहीम राबवावी, निरुपयोगी टायर्स, करवंट्या, प्लास्टिक वस्तू अशा अनावश्यक गोष्टी नष्ट कराव्यात, पाण्याची डबकी बुजविणे, पाणी वाहते करणे, आठवड्यातून एक कोरडा दिवस जाहीर करणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावे, ताप आल्यानंतर रक्ताची तपासणी करावी अशा सूचना आरोग्य विभागाद्वारे ग्रामपंचायतला दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)