भंडारा : धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी सांगितले.प्रत्येकाच्या मागे कामाचा व्याप असतो. या कामाच्या ओझ्यामुळे साहाजिकच चिडचीड निर्माण होते. त्यातून विविध समस्या निर्माण होऊ शकतात. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने चांगले आणि गोड बोलणे आवश्यक आहे. दिवसभरात आपल्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी सहानुभूतीपूर्वक व्यवहार करून त्याच्याशी गोड बोलले आणि त्याच्या तक्रारीचे निरसन केले तर सुसंवाद निर्माण होऊ शकतो. तसेच या वृत्तीने झटपट कामही निकाली काढण्यास मदत होते. काम करताना कोणताही ताण तणाव राहत नाही. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने ही कला आत्मसात करून तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. इतरांशी प्रेमाने बोलून सुसंवाद साधल्यास आपल्या कार्यालयातच नव्हे तर समाजातही पोषक वातावरणाची निर्मिती होते. शिवाय गोड बोलण्याचा सर्वाधिक फायदा आपल्या आरोग्याला होतो. यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे रवींद्र मानकर यांनी सांगितले.पैसा संपत्तीच्या मोहात मनुष्य आपली सामाजिक बांधीलकी विसरत चालला आहे. त्यातूनच गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सुसंवाद साधणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर म्हणाले.
सुसंवाद असल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:50 IST
धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी सांगितले.
सुसंवाद असल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते
ठळक मुद्देएलसीबीचे रवींद्र मानकर म्हणतात