शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

होळीसाठी वृक्ष तोडाल तर थेट कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवार आवाहन केल्यानंतरही वृक्षांची तोड केली जाते. मात्र, यंदा अशी वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात जंगलातील वृक्षांची कत्तल करून होळी पेटविली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. भंडारा येथे नव्यानेच रुजू झालेल्या उपवनसंरक्षकांनी खास आदेश काढून वृक्षतोड करणाऱ्यांची थेट कारागृहात रवानगी करण्याचे निर्देश दिले. यासोबतच आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवार आवाहन केल्यानंतरही वृक्षांची तोड केली जाते. मात्र, यंदा अशी वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. तसेच मालकी क्षेत्रातील वृक्षतोड करणाऱ्यांवर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश उपवनसंरक्षक गवई यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. नाकाबंदी, वाहन तपासणी करण्यात येणार असून संयुक्त वनव्यवस्थापन समितीचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्दहोळीच्या कालावधीत वृक्षतोड व शिकारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने वनविभागाने योग्य नियोजन केले आहे. या कालावधीत अपवादात्मक परिस्थिती वगळून सर्व प्रकारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अधिनस्थ वनपाल, वनरक्षक, वनमजूर कर्मचाऱ्यांनी आपल्या नेमून दिलेल्या कामावर हजर राहावे. कुणी गैरहजर आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

१६२ नियतक्षेत्रात गस्त- भंडारा जिल्ह्यात ९२७ चौरस किलोमीटरचे जंगल आहे. या जंगलाचे १० रेंजमध्ये विभाजन करण्यात आले. ३९ राऊंड आणि १६२ नियतक्षेत्र (बीट) आहेत. या सर्वच क्षेत्रात गस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. होळीपूर्वी व होळीनंतर दोन ते तीन दिवस संवेदनशील क्षेत्रामध्ये गस्त घालण्याचे निर्देश दिले असून प्रादेशिक वनक्षेत्रासोबतच इतर जंगलात वाहनाद्वारे विशेषत: रात्री गस्त वाढविण्यात आली आहे.

वनविभागाची शिकाऱ्यांवर करडी नजर-  वृक्षतोडीसोबतच धूलिवंदनाच्या दिवशी मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा अवैध शिकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. संवेदनशील क्षेत्रासोबतच वन्यप्राण्यांच्या शिकारी झालेल्या परिसरात ही गस्त राहणार आहे. तसेच विजेच्या प्रवाहाने शिकार झालेल्या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले.

होळी सण साधेपणाने साजरे करा : वसंत जाधव

होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी अगदी साधेपणाने साजरी करावी. जातीय सलोखा टिकवून ठेवत शांततेत सण, उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे. भंडारा जिल्ह्यात सण - उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. संशयित व्यक्ती, महिला, मुलींच्या छेडखानीचा प्रकार आढळल्यास याबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तरुणांनी अतिप्रमाणात मद्यसेवन करुन वाहन चालवू नये, असेही त्यांनी म्हटले.

होळीचा सण पर्यावरणाचा विचार करून सर्वांनी साजरा करावा. वृक्षतोड करून होळी साजरी करण्यापेक्षा वृक्ष पूजनाने होळी साजरी करावी. वृक्षतोड करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.-राहुल गवई,  उपवनसंरक्षक, भंडारा.

 

टॅग्स :Holiहोळी 2022forest departmentवनविभाग