शेतकऱ्यांची कोंडी : दाखला मिळत नसल्याने धावपळभंडारा : ठिबक सिंचनचे अनुदान लाभार्थ्याला मिळू नये, यासाठी शासनाकडूनच अवघड व जाचक अटी लादल्या जात असल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. त्यापैकी ठिबकचे अनुदान हवे असेल, तर लाभार्थ्याला दोनपेक्षा अधिक अपत्य नसावीत, ही अट या नियमाला आणि ठिबकच्या अनुदानाशी संबंध जोडून अनुदानाच्या अडचणीत भर पडली आहे.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ठिबकचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून आता शेतकऱ्यांनाही याबाबत कळून चुकले आहे. दुष्काळी भागात ठिबकने लाखो हेक्टर फळबागा जगविल्या जात आहेत.ठिबकबाबत शासन स्तरावरून चर्चा होत असताना मिळणाऱ्या अल्पशा अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे. लाभार्थ्याला तिसरे अपत्य नसावे यासारखे अजब फतवे कृषी विभागाने लावले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समित्या निवडणुकांना हा नियम लागू असताना ठिबक अनुदानासाठी शेतकऱ्यांना लावण्याचा संबंध काय आहे, असा प्रश्न आहे. अनुदानासाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांचा तिसरे अपत्य नसल्याच्या दाखल्यापर्यंतच नाही. ग्रामसेवकांकडून दाखले मिळत नसल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) ठिबक लाभार्थ्यांना फटकाग्रामीण भागातील निवडणुकीत कुरघोडी करण्यासाठी तिसऱ्या अपत्याचा मुद्दा बऱ्याच भागात निवडून आल्यानंतर शस्त्र म्हणून वापरला जातो. काही भागात निवडणुकीच्या आधी ग्रामसेवकांनी तिसरे अपत्य नसल्याचा दाखला दिलेला असताना नंतरही उमेदवारांना तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचा ठपका ग्रामसेवकांवर येऊन काही ग्रामसेवकांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. उमेदवार काही वेळेस खोटी माहीती देतो त्याची शहानिशा करणे बरेचदा अशक्य होते. यावर ग्रामसेवकांच्या संघटनेचे असे दाखले न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी निवडणुकीशी तसा काही संबंध न येताही त्याचा फटका ठिबक लाभार्थ्यांना बसत आहे.
तीन अपत्य असल्यास ठिबक अनुदानाला ठेंगा
By admin | Updated: October 10, 2016 00:29 IST