शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटी शिक्षकांची सेवा संपुष्टात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:33 IST

सध्याच्या संगणक युगात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाचे अध्यापन करण्यासाठी केंद्र सरकारने क्रांतीकारक पाऊल उचलून सन २००८ पासून आयसीटी शिक्षण प्रणाली अमलात आणली.

बेरोजगारीची कुऱ्हाड : २५ ला धरणे आंदोलन सासरा : सध्याच्या संगणक युगात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाचे अध्यापन करण्यासाठी केंद्र सरकारने क्रांतीकारक पाऊल उचलून सन २००८ पासून आयसीटी शिक्षण प्रणाली अमलात आणली. महाराष्ट्र शासनाने केंद्र पुरस्कृत आयसीटी शिक्षण प्रणाली राज्यात सुरु केली. मात्र, या शिक्षकांची सेवा १५ आॅगस्टला संमाप्त होत असल्याने राज्यातील शेकडो शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.राज्यात आयसीटी प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाचे उत्तम ज्ञान मिळू लागले. पण ही प्रणाली खासगी कंपन्या राबवित असल्याने त्यांनी अत्यल्प मानधनावर आयसीटी शिक्षकांची नेमणूक केली. संगणकीय ज्ञानाची गरज ओळखून भविष्यात या क्षेत्रात कायमस्वरुपी नोकरी मिळेल या हेतूने हातातील कामे सोडून आयसीटी शिक्षक म्हणून मोहोर लावली. या प्रणालीत पाच ते सात वर्ष काम करूनही त्यांच्या मानधनात वाढ न झाल्याने भविष्य अधांतरी असल्याचे संकेत दिसताच राज्यातील आयसीटी शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमीक महासंघ यांच्या वतीने शासनाला निवेदन दिले.शासनाने त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे मोर्चा काढला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. प्रत्युत्तर म्हणून केवळ आश्वासने देण्यात आली. शेवटी शासनाच्या निद्रीस्तपणाचे बक्षिस म्हणून भावी काळातील आयसीटी शिक्षक म्हणून स्वप्न पाहणाऱ्या आयसीटी शिक्षकांना १५ आॅगस्टनंतर सेवा संपुष्टीचा संबंधित आस्थापनेला पत्र देण्यात आला. परिणामी ५ ते ७ वर्ष शिक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्यातील जवळपास २ हजार शिक्षकांवर बेरोजगारीची व उपासमारीची वेळ आली. आंदोलने, संप, मोर्चा यांच्या माध्यमातून न्याय मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात आले. पण अद्यापही तोडगा न निघाल्यामुळे मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात २५ जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार आयसीटी शिक्षकांनी केला आहे. येत्या १५ आॅगस्टनंतर राज्यातील सर्व आयसीटी शिक्षकांना घरी बसावे लागणार असल्याने न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन क्रांतीकारक ठरणार असल्याचे संकेत दिसून येत आहे. आयसीटी शिक्षकांच्या सेवा संपुष्टीत करून त्यांच्या भविष्याची राखरांगोळी करण्यापेक्षा कंपन्यांचे करार संपुष्टात आणून ही प्रणाली शासनाने ताब्यात घेवून कार्यरत शिक्षकांचे पद निर्धारण करून कायमस्वरुपी सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. येत्या २५ जुलै रोजी होवू घातलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात राज्यातील सर्व आयटीसी शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, उपाध्यक्ष घनश्याम कापगते व सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी केले आहे. (वार्ताहर)