शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटी लॅब धूळ खात

By admin | Updated: February 3, 2017 00:38 IST

राज्य शासनाच्या उदासिनतेमुळे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी आयसीटी शिक्षकांअभावी संगणक शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

शिक्षकांचा करार संपला : विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचितसासरा/सानगडी : राज्य शासनाच्या उदासिनतेमुळे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी आयसीटी शिक्षकांअभावी संगणक शिक्षणापासून वंचित राहात आहेत. एकीकडे डिजिटल इंडियाची घोषणा सुरू असतानी राज्य शासनाची उदासिनता संगणक शिक्षणालाच कायमचा संपवण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटी संगणक शिक्षकांचा करार संपल्याने माध्यमिक शाळांमधील आयसीटी लॅब धूळखात पडल्या आहेत. परिणामी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डिजिटल होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.देशातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पायाभूत संगणकीय शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने केंद्र शासनाने २००८ सालापासून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये लाखो रूपये खर्च करून आयसीटी योजना केंद्र व राज्य शासनाच्या संयुकत सहकार्याने ७५-२५ टक्के आर्थिक सहभागातून सुरू केली. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून संगणकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची आयसीटी निदेशक (शिक्षक) म्हणून नियुक्त्या केल्या. शाळांना किमान १०-२० संगणकासह सर्व सोयी सुविधायुक्त संगणक लॅब उपलब्ध करून दिल्या. जवळपास ८ हजार आयसीटी शिक्षक नेमल्या गेले. मात्र नूतनीकरणाच्या नावाखाली प्रत्येक वर्षी मुलाखती घेवून संबंधित कंपन्यांनी ११ महिन्यांचा करार करून पहिल्या टप्प्यातील ५०० व दुसऱ्या टप्प्यातील २५०० शिक्षकांना घरी बसवले. संगणक शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची संघटनेकडून मागणी होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या उदासिनतेने राज्यातील लाखो विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची बाब पुढे आली आहे. मग ही योजना नेमकी कोणासाठी हा प्रश्न कायम दिसून येत आहे. शासन शिक्षणासारख्या गंभीर विषयावर विचार करणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे पंतप्रधान डिजिटल इंडियाची घोषणा करत आहेत मग लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याचा धोका समोर दिसत असतानासुद्धा डिजीटल इंडिया संकलपनेला छेद देण्याची भूमिका भाजपाचे राज्यसरकार का घेत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. (वार्ताहर)