शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

चिन्ह बदलेल्या उमेदवाराचे उपोषण सुरु

By admin | Updated: July 3, 2015 01:00 IST

जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रदान करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हावर दोन दिवस प्रचार केल्यानंतर अचानक चिन्ह बदलण्यात आला.

साकोली : जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रदान करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हावर दोन दिवस प्रचार केल्यानंतर अचानक चिन्ह बदलण्यात आला. त्यामुळे उमेदवार संभ्रमात पडला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या नियमबाह्य कृतिविरोधात त्यांच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.साकोली तालुक्यातील किन्ही (एकोडी) या जिल्हा परिषद गटातून कैलास गेडाम अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे. २९ जून रोजी नामनिर्देेशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात कैलास गेडाम यांना 'विमान' चिन्ह मिळाले. या चिन्हाचे पत्रक व बॅनर तयार करून गेडाम यांनी दोन दिवस प्रचार केला. तथापि तिसऱ्या दिवशी गेडाम यांना विमान ऐवजी टेबल चिन्ह दिल्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने भ्रमणध्वनीद्वारे दिली. हे ऐकून गेडाम बुजकड्यात पडले. प्रचाराला केवळ दोन दिवसाचा अवधी असल्याने नवीन चिन्हावर प्रचार करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चिन्हात बदल करताना निवडणूक नियमानुसार गेडाम यांना विमान चिन्ह दिल्याचे वा त्यांना टेबल चिन्ह दिल्याचे तसेच गेडाम यांनी नवीन चिन्ह नाकारल्याचे कोणतेही पत्र या उमेदवाराच्या घरावर चिकटविण्यात आले नाही. उमेदवाराने नवीन चिन्हाचा विरोध करताच त्यांच्या गैरहजेरीत पत्रक चिकटवून वडिल आणि पत्नीची बळजबरीने स्वाक्षरी घेण्यात आल्याचा तसेच नवीन चिन्ह स्विकार करण्याबाबत दबात आणला जात असल्याचा आरोप गेडाम यांनी केला आहे.निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पुर्वी दिलेले विमान चिन्ह कायम ठेवावे, अशी मागणी करीत गेडाम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जुने चिन्ह कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी आज गुरूवारपासून साकोली येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर कैलास गेडाम यांनी उपोषणाला प्रारंभ केला.