शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मने बदलली.. अन् मतेही..!

By admin | Updated: May 19, 2014 23:18 IST

केंद्रातील संपुआ सरकारने राबविलेल्या विविध योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही संपुआ सरकारच्या काळात झालेले घोटाळे, वाढलेली महागाई,

कार्यकर्त्यांची निवडणूक : आघाडीसाठी धोक्याची घंटा, नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ

भंडारा : केंद्रातील संपुआ सरकारने राबविलेल्या विविध योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही संपुआ सरकारच्या काळात झालेले घोटाळे, वाढलेली महागाई, भ्रष्टाचाराचा झालेला कहर यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष संघटीत करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चोखपणे बजावण्यात आले. आक्रमक प्रचार अन् मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार या दोन मुद्यांवर संपूर्ण देश ढवळून निघाला आणि वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशा स्वरूपात ईव्हीएममधून मते बाहेर पडली. ‘रोम वॉज नॉट ब्युल्ट इन अ डे’ या म्हणीप्रमाणे ही सारी किमया एका दिवसात झाली नाही. लोकांची मने हळूहळू बदली व या बदललेल्या मनांवर जात-पात, धर्म, विचारधारा यासोबतच कुठल्याही स्थानिक मुद्यांचा प्रभाव पडला नाही. मते बदलली, मते बनली, मते ठाम राहिली व चमत्कार घडला याला भंडारा लोकसभा मतदारसंघ अपवाद राहिलेला नाही. भंडारा लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपचे नाना पटोले यांनी मिळविलेला लाखांहून अधिक मताधिक्याचा विजय हा केवळ अशा बदललेल्या मनांचा परिणाम आहे. ही मने फक्त नाना पटोलेंसाठी निश्चितच बदलली नाहीत तर मोदींसाठी झालेले हे मन परिवर्तन आहे, हे आता सर्वच मान्य करीत आहेत. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांच्यासारखा मातब्बर नेता रिंगणात होता, मोदींच्या विरोधात असलेले मुस्लिम व दलित मतांची मोट बांधून फायदा उचलण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, तो मोदी लाटेपुढे सपेशल फेल ठरला. प्रतिष्ठा पणाला लावूनही ‘घडी’ नीट बसली नाही, कारण लाटच मोठी होती. नानासाठी कुणबी समाजात एकजूट झाली, परंतु मिळालेले मताधिक्य हे केवळ कुणबी एकजुटीचे नाही, हे ही ुनिकालावरुन मान्यच करावे लागेल. या निवडणुकीत ‘मोदी’ लाट होती, हे निकालच सांगतात, मात्र या लाटेमागील कार्यकारणभाव लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकांना आता गृहीत धरता येणार नाही. आज ते तुमच्या सोबत असले तरी ईव्हीएमपर्यंत त्यांचे मते बदलू शकतात, हे विसरता येणार नाही. लोक बोलत नाहीत करून दाखवितात याचे प्रत्यंतर या निमित्ताने समोर आले आहे. निवडणुकीत मोठी हवा निर्माण करण्याचा आव आणलेल्या ‘आप’ला मतदारांनी सपेशल नाकारले आहे. भंडार्‍यात ‘आप’ मिडीयावर गाजले. परंतु ते ‘सोशल’ झाले नाहीत. लोकांना आता सत्य समजते, उमजते व ते प्रगटही होते, हे निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभेत आता ‘पब्लिक फर्स्ट’ हेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे, यात शंका नाही. हा निकाल म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना ‘ठेच’ आहे. आता ती लागली. फक्त पुढे शहाणा कोण होतो, यावरच सारे काही अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)