शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिकारी व ट्रॅक्टर वनविभागाला सापडलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:24 IST

वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

ठळक मुद्देप्रकरण वलमाझरी जंगलातील रानगव्याच्या शिकारीचे : साकोली तालुक्यात शिकारीच्या प्रमाणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.२५ मे रोजी दुपारी वलमाझरीच्या जंगलात एका रानगव्याची विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने शिकार करून मृत रानगवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणून फेकल्याची घटना उघडकीस आली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचा ताफा घटनास्थळावर पोहचला. त्या रानगव्याला तिथेच खड्डा खोदून पुरण्यात आले.या घटनेला तब्बल दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी रानगव्याची शिकार करणारे व शिकारीनंतर या रानगव्याला ज्या ट्रॅक्टरने सोडण्यात आले त्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यास वनविभागाला अपयश आले आहे.ही घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शिकाºयाच्या शोधात पिटेझरी, वलमाझरी, तुडमापूरी, वडेगाव अशा विविध गावी व विविध ठिकाणी शिकाºयांच्या शोधात फिरत असले तरी शिकारी व वाहनाचा अद्याप शोध लागला नाही.शिकारीच्या प्रमाणात वाढसाकोली तालुक्यात वनविभागाची यंत्रणा मजबूत असतानाही तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर गदा आली आहे. या शिकारीवर आळा बसणे गरजेचे आहे.वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंतीयावर्षी अत्यल्पपावसामुळे जंगलातील पाणीसाठी ओस पडले. परिणामी वन्यप्राणी पाण्यासाठी सैरावैरा पळत असून गावाकडे धाव घेतात व शिकारीला बळी पडतात.मुख्यालयी राहात नाहीवनाच्या रक्षणाकरिता वनविभागाने वनकर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्या वनकर्मचाºयांना मुख्यालय नेमून दिले आहे. मात्र वनकर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात. त्यामुळे अवैध वृक्षकटाई व शिकारीत वाढ होत आहे. तसेच फिरते पथकही कुचकामी ठरत आहे.