शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामीण रुग्णालयावर धडकले शेकडो तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 23:13 IST

सबका साथ सबका विकासाचा नारा देणाऱ्या शासनाचा आरोग्य सेवेवर अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सामान्यातला सामान्य माणूस प्रभावित झाला आहे. गोरगरीब आरोग्य सेवेपासून मुक्त असल्याचे वास्तव पालांदुरातील ग्रामीण रुग्णालयात अनुभवायला मिळाले. रुग्णांची होत असलेली गळचेपी असह्य झाल्याने अख्खी तरुणाई शेकडोंच्या संख्येने माजी जि.प. सदस्य भरत खंडाईतच्या सोबतीने ग्रामीण रुग्णालयात धडकले.

ठळक मुद्देआरोग्य व्यवस्था खिळखिळी : १०८ रुग्णसेवेचा दुरूपयोग

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : सबका साथ सबका विकासाचा नारा देणाऱ्या शासनाचा आरोग्य सेवेवर अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सामान्यातला सामान्य माणूस प्रभावित झाला आहे. गोरगरीब आरोग्य सेवेपासून मुक्त असल्याचे वास्तव पालांदुरातील ग्रामीण रुग्णालयात अनुभवायला मिळाले. रुग्णांची होत असलेली गळचेपी असह्य झाल्याने अख्खी तरुणाई शेकडोंच्या संख्येने माजी जि.प. सदस्य भरत खंडाईतच्या सोबतीने ग्रामीण रुग्णालयात धडकले.पालांदुरात चार कोटीची ग्रामीण रुग्णालयाची इमारत सर्वसोईनिशी दिमाखात उभी आहे. निवासी सदनिकांचे सुमारे २५ लक्ष रुपयाचे बांधकाम धडाक्यात सुरु आहे. मात्र यात वैद्यकीय अधीक्षकासह २ डॉक्टरांचे पद रिकामे आहे. परिचारिका रक्ततपासणी तज्ज्ञ, तपासणीचे साहित्य, प्रसुतीकरिता लागणारे साहित्य, औषधसाठा, अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नाही. ३० खाटांचे मंजूर रुग्णालयात केवळ पाच खाटा आहेत. रक्तदाब, रक्तातील साखर, मुत्र तपासणी कर्मचाºयांअभावी होत नाही. रोजंदारीच्या आधारे आरोग्य सेवा कशीतरी पुरविली जाते. अपेक्षित औषधसाठा मागूनही मिळत नाही. गोरगरीबांनी करावे काय? असा प्रश्न विचारीत तरुणाई रोष व्यक्त करीत होती. घटनास्थळावरूनच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांच्याशी फोनवर वार्तालाप करीत १०८ रुग्णसेवेचे झालेले तीनतेरा व ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे वास्तव चित्र कळविण्यात आले. शवविच्छेदनगृह असूनही तालुका व जिल्ह्याला शवविच्छेदनाकरिता हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. हे उइचत नसल्याचे ठाणेदार अंबादास सुनगार यांनी तरुणांना लक्षात आणून दिले. जिल्हा पातळीवर पत्रव्यवहार करुनही न्याय मिळत नसल्याचे सांगण्यात आले.१०८ रुग्णसेवेचा वाढता दुरूपयोग चिंतनीय१०८ रुग्णसेवा गरीबांकरिता व अपघाताकरिता अत्यंत मोलाची व महत्वाची ठरत आहे. १०८ मुळे कित्येकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र या व्यवस्थेवर संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने सेवा खासगीत विकत असल्याचा आरोप करण्यात आला. १०८ ला तीन डॉक्टर सेवेत असून डॉ.अभय हजारे यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे डॉ.ललीत नाकाडे यांनी सांगत त्यांच्याऐवजी मेश्राम या सेवेत असल्याचे सांगितले.