शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीस जाणाऱ्या दीड हजार जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:29 IST

कतलीसाठी जाणाऱ्या दीड हजारावर जणावरांची विविध ठिकाणी सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. १२९ जणांवर गुन्हे दाखल करुन सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१२९ आरोपी : पाच कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कतलीसाठी जाणाऱ्या दीड हजारावर जणावरांची विविध ठिकाणी सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. १२९ जणांवर गुन्हे दाखल करुन सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह विविध मार्गावरुन जनावरांची निर्दयपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. कतलीसाठी ही जनावरे नेली जातात. याविरुध्द पोलिसांनी मोहीम उघडून वर्षभरात एक हजार ४४७ जनावरांची मुक्तता केली. या सर्व जनावरांची रवानगी गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये ७७ प्रकरणे दाखल करण्यात आली असून यात ७४ वाहने जप्त करण्यात आली आहे.जानेवारी महिन्यात ४४ जनावरांची सुटका करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ५१ जनावरे, एप्रिल महिन्यात ७३, मे महिन्यात १०५ जूनमध्ये ५४, जुलै २५८, आॅगस्ट ४७१, सप्टेंबर २२, आॅक्टोबर १९, नोव्हेंबर १९, डिसेंबर ०४ अशी जनावरांची सुटका झाली. या प्रकरणात १२९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर गोमांस विक्री प्रकरणात जिल्ह्यात १७ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३०२ किलो मांस जप्त करण्यात आले. तर २० जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.