शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सिंदपुरीत शेकडो संसार उघड्यावर

By admin | Updated: August 5, 2014 23:19 IST

मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसादरम्यान सिंदपुरी या गावातील माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटली. पाणी दुसऱ्या बाजूने वाहून जाण्यासाठी तलावाची पाळ फोडण्यात आली.

आजही भयावह स्थिती : मदतीसाठी ग्रामस्थांची याचना सुरूच, सेवाभावी संस्थाकडून धान्याची झाली मदतभंडारा : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसादरम्यान सिंदपुरी या गावातील माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटली. पाणी दुसऱ्या बाजूने वाहून जाण्यासाठी तलावाची पाळ फोडण्यात आली. अन्यथा संपूर्ण गावच वाहून गेले असते. या पाण्याचा फटका २,०९७ लोकसंख्येच्या या गावाला बसला. ३९१ कुटुंबसंख्येच्या या गावातील सुमारे ६० ते ६५ घरे पुर्णत: कोसळली असून १७० च्यावर घरांना क्षति पोहोचली आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ सद्यस्थितीत गावातील समाज मंदिरात आश्रयाला आहेत. काल, या गावाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी भेट दिली असता बेघर झालेल्या कुटुंबांनी ‘घर पाहिजे घर’ असा एकच टाहो होता.तुमसर तालुक्यात दक्षिणेला सिंदपुरी, उत्तरेला चांदपूर, पूर्वेला गोंदेखाली आणि पश्चिमेला मांगली आहे. उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा असल्यामुळे वरचा पाऊस थेट सिंदपुरी तलावात जमा होतो. सिंदपुरी गावाच्या हद्दीत सुमारे १३५ एकर जागेत माजी मालगुजारी तलाव आहे. यात ३६ एकर जागेची मालकी खेमराज हेडाऊ यांची आहे. या तलावातील पाण्याचा परिसरातील चार गावातील शेतकऱ्यांना लाभ होतो. या तलावाच्या पाळी जीर्ण झालेल्या आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात तलावाची पाळ फुटण्याची सुचना गावकऱ्यांनी उन्हाळ्यातच प्रशासनाला दिली होती. परंतु या तलावाची दुरूस्ती करण्यात आली नाही. आणि जे व्हायचे नव्हते तसे घडले. तलावाची पाळ फुटली. या पाण्याचा लोंढा गावात शिरला. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. घरातील अन्नधान्य वाहून गेले. कंबरेइतक्या पाण्यातून लोकांनी मार्ग काढला आणि हे कुटूंब उंचावर असलेल्या विष्णु मंदिर, हनुमान मंदिर, शाळेत आश्रयाला आले. मंदिर झाले घरसद्यस्थितीत विष्णु मंदिरात २२ ते २५ कुटूंब आहेत. ५ ते ६ कुटूंब हनुमान मंदिरात राहत आहेत. विष्णु मंदिरात वास्तव्याला असलेल्या सुर्याबाई बेनीबागडे, सुमन करंडे, कौतुका निखाडे म्हणाल्या, एकीकडे आमचे घरच पुर्णत: पडले असताना तहसीलदार २,५०० व ३,००० रुपयांचे चेक देत आहे. घरच पडले तर एवढीशी रक्कम घेऊन काय करायचे असा सवाल करून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. आम्ही हातावर आणून पानावर खाणारे, आता राहायचे घरच पाण्याच्या लोंढायाने पडले. आता आम्ही बेघर झालो, तुम्हीच सांगा आता राहायचे कुठे? असा त्या माऊलींचा प्रश्न होता. त्यानंतर हनुमान मंदिरात भेट दिली असता तिथल्या कुटूंबांनीही आता आमचे राहायचे घर पडले घराशिवाय आम्ही राहायचे कुठे? हा प्रश्न संत्रस्त करणारा होता.तलाठ्याविरुद्ध रोषगावात ६० ते ७० कुटुंबाचे घरे जमिनदोस्त झालेली असताना तलाठ्याने आमच्या घराचे पंचनामे केले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. खावटी देण्यात आली आता मदत मिळणार नाही, असे त्यांचे म्हणने होते. ज्यांचे नुकसान झाले, त्यांची नावे मदतीच्या यादीत समाविष्ट न करता अन्य लोकांची नावे समाविष्ट केल्याचा त्यांचा आरोप होता. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, असेही या ग्रामस्थांचे म्हणने होते.समयसुचकता ठरली लाखमोलाचीतलावाची पाळ फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापती कलाम शेख यांनी तलावाच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या पाळीला फोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावातील भय्यालाल वैद्य, निखिल सिंगनजुडे, सुनिल चौधरी, धनपाल वैद्य यांच्या मदतीने पाळ फोडली. त्यामुळे गावात येणारा पाण्याचा लोंढा काही प्रमाणात कमी झाला. शेख यांच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला अन्यथा गाव वाहून गेले असते...