करडी (पालोरा) : मौजा खडकी (पालोरा) येथील आदिवासी ग्राम विकास मंडळ आणि आदर्श महिला मंडळाचे वतीने हुंडाप्रथा बंद करणे तसेच दारुबंदी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. शारदा उत्सवादरम्यान दोन्ही मंडळांनी विविध खेळांचे आयोजनही यानिमित्ताने केले.मौजा खडकी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष रामदास कुर्वे यांचे आवाहनानुसार गाात आदिवासी ग्राम विकास मंडळ आणि आदर्श महिला मंडळाचे वतीने एकाच शारदा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी मंडळांना सहकार्य केले. शारदोत्सवाचे दरम्यान गावात दोन्ही मंडळाचे वतीने कबड्डी, संगीत खुर्ची, दहीहंडी फोड, हुतूतू , कीर्तन व भजन स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार आणि दारु संबंधिने दुष्परिणाम आदी विषयासंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा अतकरी, आदिवासी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष डुलीचंद साठवणे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष रामदास धुर्वे, पोलीस पाटील राजू बोंदरे, ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष बंडू मदनकर, सदस्य राजेश धुवेर, हेमा पुराम, आशिष धांडे, मधुकर आगाशे, भगवान कातोरे, दिनेश साठवणे, रविंद्र पुराम, निखील कोकोडे, जितेन्द्र हलमारे, रविंद्र खापेकर, नरेश ठवकर, मंगेश ठवकर, आदित रामटेके, दिनेश अतकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.(वार्ताहर)
हुंडाप्रथा, दारुबंदी जनजागृती कार्यक्रम
By admin | Updated: October 22, 2014 23:14 IST