शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

जिल्ह्याला भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:13 IST

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे तलावाचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्याला हुडहुडी भरली आहे. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत असून उबदार कपड्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही. पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर १ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देथंडीचा कहर : १ जानेवारीपर्यंत अती तीव्र शीतलहर राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे तलावाचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्याला हुडहुडी भरली आहे. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत असून उबदार कपड्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही. पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर १ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.गत दोन दिवसांपासून पारा सरासरीच्या खाली घसरल्याने थंडीत कमालीची वाढ झाली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्याने हुडहुडी भरत आहे. रात्रीच्या वेळी तापमान प्रचंड घटत असल्याने कमालीची थंडी वाढली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे कडाक्याची थंडी पडली आहे. शुक्रवारी सकाळपासून थंड वारा वाहत होता. त्यामुळे दिवसाचे तापमानही खाली आले होते. शुक्रवारी दिवसभर कडक उन्ह असतानाही थंडी जाणवत होती. रात्रीच्या वेळी या थंडीत प्रचंड वाढ झाली. शनिवारी पहाटे वारा वाहत असल्याने थंडीत आणखी वाढ झाली. मात्र भंडारा शहराचे नेमके तापमान किती आहे हे नोंद होत नसल्याने कळू शकले नाही.हुडहुडी भरणाºया थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण उबदार कपडे घालत आहे. शहरापासून ते ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्य आहे. दिवसभर शेकोटीचा आधार घेत अनेक जण दिसत होते. सायंकाळी थंडीत वाढ झाल्याने रस्त्यावरही शुकशुकाट निर्माण झाला होता. थंडी आणखी काही दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान खात्याद्वारे प्राप्त माहितीनुसार २९ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर प्रभावित होणार असल्याचा अंदाज आहे.या थंडीचा मनुष्यासोबतच प्राणीमात्रांवरही परिणाम होत आहे. अनेक पक्षी या थंडीमुळे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उघड्यावर झोपणाऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत. उब मिळविण्यासाठी शेकट्यांचा आधार घेत आहे. ही थंडी आणखी काही दिवस राहणार असल्याने अनेकांनी याचा धसका घेतला आहे.तापमानासाठी मोबाईलचा आधारभंडारा शहरात हवामान नोंद करण्याचे केंद्रच नाही. त्यामुळे येथील तापमानाची अधिकृत नोंदच होत नाही. प्रत्येक जण मोबाईलवरून तापमानाचा अंदाज घेत आहे. मोबाईलवरील तापमानानुसार भंडारा शहराचे शनिवारी कमाल २४ अंश सेल्सीअस तर किमान ८ अंश सेल्सीअस तापमान दर्शविण्यात आले होते. मात्र मोबाईलवरील तापमान अधिकृत नसल्याने भंडारा शहराचे नेमके किती तापमान आहे हे कळायला मार्ग नाही. शासकीय स्तरावर कुठेही नोंद होत नाही. तर भंडारा येथील जलसंपदा विभागाच्या हवामान केंद्रात शनिवारच्या तापमानाची नोंद ७.५ अंश सेल्सिअस झाली होती.