शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहरात पायी चालायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची कसरत होत आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची परिस्थिती असतानाही भंडारा नगरपरिषद मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच हे चित्र बदलताना दिसत नाही. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील विविध वाॅर्डात अनेक घरमालकांनी आपल्या घरासमोर असलेल्या जागा बांधून काढल्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्या घरासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी कसरतीचे ठरत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत भंडारा शहरातील बाजारपेठेत विविध खरेदीसाठी गर्दी होते. मात्र, दिवसेंदिवस शहरातील मोठा बाजार परिसरासह अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यांवर झालेले अतिक्रमण आणि प्रमुख रस्त्यावरच विक्रेते दुकाने लावून बसत असल्याने पायी चालणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. भंडारा शहरात ग्रामीण भागातील अनेक नागरिक खरेदीच्या निमित्ताने येत असतात. मात्र, अशावेळी वाहने उभी करायची कोठे असा प्रश्न उभा राहतो. अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची कसरत होत आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची परिस्थिती असतानाही भंडारा नगरपरिषद मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच हे चित्र बदलताना दिसत नाही. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील विविध वाॅर्डात अनेक घरमालकांनी आपल्या घरासमोर असलेल्या जागा बांधून काढल्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्या घरासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी कसरतीचे ठरत आहेत.  त्यामुळे धोका वाढला आहे. 

अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची मागणी- भंडारा नगरपरिषदेने शहरातील बसस्थानक ते गांधी चौक तसेच मुस्लीम लायब्ररी चौक राजीव गांधी चौक व खात रोड वर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक दुकानांसमोर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होते. याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणीही जोर धरत आहे. भंडारा नगरपरिषदेने फिरत्या पथकाची नेमणूक करून अतिक्रमण केलेल्या जागांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास- भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे वरठी, तुमसरकडे जाणारे वाहने याच मार्गाने जात असल्याने या मार्गावर अनेकदा गर्दी असते. यासोबतच रविवार आणि बुधवारी गर्दीने वाहतूक कोंडी होते. मात्र, याबाबत भंडारा नगरपरिषद, पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

शहरातील फूटपाथ नावालाच- भंडारा शहरातील बसस्थानक ते गांधी चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, खात रोड परिसरात प्रमुख रस्त्यांवर असलेले फूटपाथ हे कागदावरच दिसून येत आहेत. या प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून रहदारीसाठी रस्ता अरूंद ठरत आहे.  त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र, याकडे नगर परिषद प्रशासनाचे  दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

भंडारा शहरातून पायी चालताना भीती वाटते. भंडारा शहरातून मोठा बाजार परिसर, बसस्थानक, खात रोड, खाम तलाव चौक परिसरात पायी चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न व अरूंद रस्त्यावरून जाताना समोरून येणारे वाहन आपल्याला धडक मारते की काय असा भास होतो.- विवेक मेश्राम, भंडारा

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण