शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

व्हॅक्सिनविना तिसरी लाट रोखणार तरी कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, जोपर्यंत लसीचा साठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत नागरिकांना लस कशी देणार,  असाही प्रश्न  जिल्हा प्रशासनाला सतावत आहे. संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे मत आधीच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेदरम्यान कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजनटंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्राणवायू प्रकल्पाचे काम मात्र युद्धपातळीवर : ऑक्सिजन बेडचीही निर्मिती, लस टंचाइचा मुद्दा ऐरणीवर

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा :  आता कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात प्राणवायू प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑक्सिजन बेडनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे; परंतु जिल्ह्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचा तुटवडा उद्भवला आहे. परिणामी, व्हॅक्सिनविना तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा सवाल आपसूकच निर्माण झाला आहे.जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, जोपर्यंत लसीचा साठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत नागरिकांना लस कशी देणार,  असाही प्रश्न  जिल्हा प्रशासनाला सतावत आहे. संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे मत आधीच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेदरम्यान कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजनटंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे.याशिवाय प्रत्येक तालुक्यातही प्राणवायूनिर्मिती प्रकल्प कार्याला गती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी संकट टाळण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे.  खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने अदानी समूह हा प्लांट उभारणार असून, तीन महिन्यांत तो कार्यान्वित होणार आहे. जवाहरनगर येथील आयुध निर्माणित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची मागणी आता होऊ लागली आहे. मात्र, आता व्हॅक्सिनचा तुटवडा मोहिमेत मोठी अडचण निर्माण करणार आहे.वारंवार मागणी करूनही शासनाकडून नाममात्रच लस उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे  जिल्हा आरोग्य विभागाला नियोजन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय लसीकरण मोहिमेची गतीही मंदावली आहे. कोविडची तिसरी लाट भंडारा जिल्ह्यावर ओढवण्यापूर्वी जिल्ह्याला मुबलक लससाठा मिळून देण्यासाठी प्रशासन गंभीर असले तरी जे लसीकरणासाठी इच्छुक आहेत, अशांना लस उपलब्ध होत नाही, अशी बाब दिसून येत आहे.

विषम परिस्थितीतही कोरोना योद्धांची उत्कृष्ठ कामगिरीप्रकृती खालवलेल्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले     जात आहे. संशयितांसह कोविड बाधितांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करून त्यांची   तासांतच कोविड चाचणीवर भर दिला जात आहे.चाचणी केलेल्या व्यक्तीची कोविड चाचणी अहवाल येईपर्यंत त्याला गृहअलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लक्षणविरहित तसेच काेविडची सौम्य लक्षणे असलेल्यांना गृहअलगीकरणात तर कोविडची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. विषम परिस्थितीतही कोरोना योद्धांची उत्कृष्ठ कामगिरी ही जिल्हा आरोग्य प्रशासनाची जमेची बाजू ठरली आहे. सोयी-सुविधा भर देत आलेल्या तक्रारींवरही लक्ष दिले जात आहे. कारोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

लसीबाबत समाजमाध्यमांवर उलटसुलट पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. त्यावर विश्वास न ठेवता लस घ्यावी. लस सुरक्षित असून कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. १८ ते ४४ वयोगटासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र लसीच्या उपलब्धते अभावी या गटाचे लसीकरण शासनाच्या सुचनेनुसार तूर्तास थांबविण्यात आले आहे.          - संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा

लसअभावी मोहीम ठरतेय नावालाच १८ ते ४४ आणि ४५ पेक्षा जास्त वयोगटातील किती लाभार्थ्यांना कोविडची लस द्यावी लागेल याची माहिती आरोग्य विभागाने शासनाला पाठविली आहे. काही दिवसांपासून नाममात्र लससाठा  जिल्ह्याला मिळाल्याचे दिसून येते.   कृती दलाच्या बैठकितही  लसीच्या उपलब्धतेवर चर्चा करण्यात आली. ४५ वर्षावरील १ लाख ६७,९८२  नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३५ हजार ४०२ एवढी आहे. त्यामुळ सध्या शिल्लक असलेल्या व्हॉयल या केवळ या वयोगटाकरीता राखीव ठेवल्या आहेत. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या