शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डेल्टा प्लसला कसे रोखणार? जिल्हा परिषद चौकात दहापैकी सहा जण विनामास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : राज्यातील अन्य जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातही दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, नागरिक ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : राज्यातील अन्य जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातही दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत काय, असे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येत आहे. याबाबत ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले असता सार्वजिनक ठिकाणी नागरिक मास्क विना वावरताना दिसत आहे. येथील जिल्हा परिषद चौकात दहापैकी सहा जणांनी मास्क घातले नसल्याने डेल्टा प्लसला रोखायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होतो.

बॉक्स

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही नाही

कोरोनाच्या महामारीत शासनाने अनेक कडक निर्बंध लावले होते. त्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांनाकडून दंडही वसूल करण्यात येत होता. मात्र, जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर नागरिकांनी मास्कविना येणे-जाणे सुरू केले आहे. तरीही प्रशासन अशांवर कारवाई करीत नाही.

बॉक्स

पोलिसांचाही मास्क तोंडाखाली

भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात पोलीस दादांची ड्यूटी असते. कर्मचारीही मास्क घालून कर्तव्य बजावतात. मात्र, मंगळवारी सायंकाळी रियालिटी चेकप्रसंगी येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी मास्क घालून होते. मात्र, तो मास्क त्यांच्या हनुवटीवर होता. त्यामुळे अन्य काय बोध घेतील, असाही प्रश्न उपस्थित होतो. नियम पाळणे आवश्यक झाले आहे.

कोट

भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून आरोग्य प्रशासनाने हा दिवस खेचून आणला आहे. हमखासपणे यात नागरिकांचेही सहकार्य लाभले आहेत. मात्र, आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जेणेकरून डेल्टा प्लसला जिल्ह्यात शिरकाव करणे शक्य होणार नाही.

- डॉ. निखिल डोकरीमारे,

आरएमओ (बाह्य विभाग), जिल्हा रुग्णालय, भंडारा.