भंडारा : सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. होळीच्या हंगामातही सोन्याच्या दराने ९० हजारांपर्यंत उसळी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या दरात पुन्हा दोन ते तीन हजारांनी वाढ झाली आहे. सध्या सोन्याच्या दरात चढ-उतार कायम सुरू आहे.
असे आहेत भावमहिना सोने प्रति तोळा चांदी प्रति किलोजानेवारी ८७,००० १०१०फेब्रुवारी ८७,५०० ९५०मार्च ९०,००० १०२०
पाच वर्षांत सोन्याच्या दरात दुपटीपेक्षाही अधिक वाढसन २०१९ मध्ये सोने प्रति १० ग्रॅम ३७हजार ५०० रुपये, तर चांदी प्रतिकिलो ४२ हजार १०० रुपये होती. २०२० वर्षात सोने ४८,८०० आणि चांदीचा दर ५९ हजार झाला. सध्या सोन्याने २० हजार तर चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. खरेदीचा जोर कायम आहे.
लाखांचा टप्पा ओलांडणारसोन्यासह चांदीच्याही दरानेही उच्चांक गाठला आहे. भाववाढीचा वाढता आलेख पाहता सोन्याचा दर लवकरच लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता सुवर्णकारांनी व्यक्त केली आहे. त्यातच मध्यमवर्गीय लग्नसराईसाठी सोने खरेदीचा विचार करताना दिसत आहेत.
चांदीही सुसाटसोन्यासोबत चांदीच्या दरानेही उसळी घेतली आहे. जानेवारीपासून चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मार्च महिन्यात चांदीचा दर १ लाख २ हजार प्रतिकिलो राहिले आहे.