शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

भंडारा-साकोली प्रवाशांचे बसभाडे किती?

By admin | Updated: June 5, 2014 23:50 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे राज्य परीवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र एसटी महामंडळाच्या प्रवासात आता तिकिटाचे दर वेगवेगळे लागत असल्यामुळे प्रवाशांच्या मनात तिकिटाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

भंडारा :   प्रवाशांच्या सेवेसाठी असे राज्य परीवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र एसटी महामंडळाच्या प्रवासात आता  तिकिटाचे दर वेगवेगळे लागत असल्यामुळे प्रवाशांच्या मनात तिकिटाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.  दि.१ जूनपासून एसटी विभागातून तिकिट वाढ झाली असली तरी दि.३१ मे २0१४ रोजी नागपूर- लालबर्रा या बसने भंडार्‍याहून साकोली येथे प्रवास केला असता त्यांना तिकिटाचे दर हे ४८ रूपये आकारले. तेव्हाच बसमधील प्रवाशांनी बसच्या वाहकांना विचारले असता तिकीट मशीन मध्ये बिघाड आहे, असे त्यांनी सांगितले. नंतर त्याच दिवशी त्याच प्रवाशांनी साकोली-भंडारा हा प्रवास केला असता तेव्हा त्यांना ४२ रूपयाचे तिकीट आकारले. दुसर्‍या दिवशी म्हणजे दि.१ जूनला प्रवाशांनी प्रवास केला. आजपासून भाडेवाढ झाल्याने ४४ रूपये तिकिट पडले, तर दि.२ जून ला प्रवास केला असता ४३ रूपये भाडे पडले म्हणजेच सलग तीन दिवसात प्रवाशांनी प्रवास केला असता तिनही दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे तिकिटे प्रवाशांना द्यावे लागले. यावरून भंडारा-साकोली या प्रवाशांचे नेमके भाडे किती याविषयी प्रवाशांच्यामनात संभ्रम आहे. याविषयी विषयी इतरही वाहकांना विचारले असता तिकिट मशीनमध्ये बिघाड असल्याने वेगवेगळी तिकिटे पडतात व त्याविषयी आम्ही वरिष्ठांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले परंतु कधी कमी तर कधी जास्त तिकिट घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला विनाकारण भुर्दंड पडत आहे. यावर राज्य परिवहन मंडळ लक्ष देईल का, यावर प्रवाशांचे लक्ष लागून आहे.   (शहर प्रतिनिधी)