शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाअभावी आणखी किती जणांचा बळी जाणार?

By admin | Updated: June 27, 2017 00:29 IST

लाखनी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण पाच वर्षापूर्वी पूर्ण झाले. चौपदरीकरणामुळे लाखनी शहरात अपघात वाढले.

धनु व्यास : कोनशिलेची अंत्ययात्रा काढण्याचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण पाच वर्षापूर्वी पूर्ण झाले. चौपदरीकरणामुळे लाखनी शहरात अपघात वाढले. अशोक बिल्डकॉनने लाखनीच्या जनतेच्या सुरक्षिततेची हमी देत रस्त्याचे काम पूर्ण केले. परंतु हा महामार्ग हा लाखनीवासीयासाठी यमदुत ठरला आहे. लाखनी शहरातून उड्डानपुलाची मागणी असताना दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु वर्षभरानंतरही उड्डाण पुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे भूमिपूजनाच्या कोनशिलेची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा लाखनी न.प.चे उपाध्यक्ष धनु व्यास यांनी दिला.राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर शंभराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. अनेकांवर गंभीर जखमी होण्याची वेळ आली. लाखनीत अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. लाखनीतील चौक धोकादायक ठरत आहेत. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही. गतिरोधक नाही. त्यामुळे थोड्याशा चुकीमुळे किंवा जड वाहनांच्या सदोष चालविण्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.अपघात होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. समर्थनगरच्या मैदानात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे मागीलवर्षी विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कोट्यावधी रूपयांची कामे केंद्र सरकारने मंजूर केली आहेत? परंतु प्रत्यक्षात कामाला विलंब होत असल्याने शहरातील लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याठिकाणी केवळ भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे कोनशिलेची अंत्ययात्रा काढणार असल्याचे व्यास यांनी म्हटले आहे. लाखनी शहरात परिसरातील अनेक गावातून लोक येत असतात. शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते अशा या गजबजलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असतात. रस्त्यावर अवैधरीत्या वाहने उभी असतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. परंतु याकडे कुणाही लोकप्रतिनिधीचे लक्ष जात नसल्यामुळे त्यांच्याविरूद्ध लाखनीवासीयांमध्ये असंतोष पसरला आहे.