शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील जलकुंभात जंत अन् शेवाळ

By admin | Updated: March 25, 2017 00:25 IST

मोहाडी ग्रामीण रूग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यात न आल्याने या टाक्यात शेवाळ तयार झाले आहे.

मोहाडी ग्रामीण रूग्णालयातील प्रकार : अनेक वर्षांपासून सफाईअभावी रुग्णांचे आरोग्य धोक्यातसिराज शेख मोहाडीमोहाडी ग्रामीण रूग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई करण्यात न आल्याने या टाक्यात शेवाळ तयार झाले आहे. डासांच्या अळ्यासुध्दा तयार झाल्या आहेत. ज्यामुळे या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यामुळे रूग्णांना संसर्गाचा सुध्दा धोका उत्पन्न झाला आहे. ग्रामीण रूग्णालयात इमारतीवर सात ते आठ पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी चार टाक्या सिन्टेक्सच्या आहेत व उर्वरित सिमेंट क्राँक्रीटच्या तयार करण्यात आल्या आहेत. या आठ पाण्याच्या टाक्यापैकी दोन ते तीन पाण्याच्या टाक्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जातात तर दोन टाक्या वॉर्ड व शस्त्रक्रिया गृहाच्या कामासाठी वापरण्यात येतात. उर्वरित पाण्याच्या टाक्यातील पाणी प्रसाधन गृहाच्या वापरासाठी उपयोगात आणला जातो. सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या स्लॅबचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे रुग्णालय समिती सदस्य अजय गायधने, पं.स. सभापती हरिशचंद्र बंधाटे यांनी सहजच पाण्याच्या टाकीत डोकावुन बघितले असता त्यांना त्या टाकीत डासांच्या अळ्या व शेवाळ दृष्टीस पडले तसेच तळाला मातीचा गाट बसलेला दिसला. याची सुचना आमदार चरण वाघमारे यांना दिली. त्यानंतर जिल्हा आरोगय प्रयोगशाळेचे अधिकारी येथे पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी सोबत नेले. रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याच्या टाकीत जंतु व शेवाळ तयार होणे ही गंभीर आहे. या रुग्णालयात रुग्ण आरोग्य सुधारण्यासाठी येतात मात्र येथील अशुध्द पाण्यामुळे त्यांना नानाविध आजार होण्याचीच शक्यता जास्त आहे. शस्त्रक्रिया गृहात तसेच प्रसुती कक्षात निर्जंतुक पाणी असणे गरजेचे असतांना याच जंतुयुक्त पाण्याचा वापर आजपर्यंत करण्यात येत आहे. पाण्याच्या टाक्यामध्ये डासांच्या अळ्या चालताना दिसल्या. काठावर हिरवे शेवाळ लागलेले होते. हाच पाणी या रुग्णालयात येणार रुग्ण व त्यांचे नातेवाईक पितात. नागरिकांच्या जिवनाशी हा खेळ अनेक दिवसांपासुन सुरु आहे. दोषी डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी.-हरिशचंद्र बंधाटे, सभापती मोहाडीपाण्याच्या टाक्या नेहमी साफ होत असतात. दर महिन्याला गावातील पाण्याची तसेच रुग्णालयातील पाण्याची तपासणी प्रयोगशाळेतुन करण्यात येत आहे. वादळामुळे टाक्यावरील झाकन उडाले असतील. आजच त्यावर झाकन बसविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. डॉ. हंसराज हेडाऊवैद्यकिय अधीक्षक,मोहाडी