शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाची वसाहत भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:18 IST

येथील ग्रामीण रुग्णालय वसाहत इमारतीचे बांधकाम गत १५ वर्षांपासून होऊन उभी असुन रंगरंगोटी झाली आहे.

ठळक मुद्देलाखांदुरातील प्रकार : १५ वर्षांपासून इमारत हस्तांतरण नाही, शासनाचे लाखो रुपये पाण्यात

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : येथील ग्रामीण रुग्णालय वसाहत इमारतीचे बांधकाम गत १५ वर्षांपासून होऊन उभी असुन रंगरंगोटी झाली आहे.मात्र संबंधित विभागाला अद्यापही हस्तांतरण झालेली नाही.येथे सध्या वन्यप्राणी, किड्यांनी जागा धरली असून उकिरडे निघत आहे.खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. याची कल्पना लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिल्या आहेत. मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.नवनवीन कामातून टक्केवारी मिळते म्हणून नवीन बांधकामाकडे कंत्राटदार मोर्चा वाढविताना दिसतात. त्यामुळे ही इमारत भग्नावस्थेत आली आहे. २० लाख रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीला व आरोग्य अधिकारी कर्मचाºयांसाठी सोय व्हावी म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च केले.मात्र कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन भूमिकेमुळे शासनावर अधिकचा भर दिवसेंदिवस पडत आहे. त्यामुळे याकडे कुणीतरी लक्ष देईल का?असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. लाखांदूर तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे या तालुक्याला येणारा निधी, योजना या सर्वांच्या शेवटी येत असतात. लाखांदूर येथील आरोग्य विभागाच्या अनेक समस्या आहेत.मात्र याकडे लोकप्रतिनिधी डोळेझाक करून भावनिक समजूत घालून आपलेच काम काढून घेण्यात मश्गुल असतात. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीसाठी लाखांदूर-साकोली महामार्गावर जागा मुकरार करून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मागील १५ वर्षापुर्वी २० लाख रुपये खर्च करून इमारत बांधकाम केले. रंगरंगोटी केली. विद्युत पुरवठाही सुरू केला होता. त्यावेळी कंत्राटदारांची माशी कुठे शिंकली कुणाशी माहीत त्या इमारतीचे हस्तांतरण होऊ शकले नाही. त्यामुळे ती इमारत भग्नावस्थेत उभी असुन खाली जागेत काही नागरीक अतिक्रमण करीत आहेत. काही आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता 'अपडाऊन'करतात तर, काही कर्मचारी लाखांदुरात राहतात. अर्ध्याअधिक जागा रिक्त असल्याने काही कर्मचाºयांवर अधिकचा ताणही पडत आहे. मात्र ना जागा भरायची, ना वसाहत इमारत हस्तांतरण करायची असा पवित्रा लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य सेवेसाठी जनता तर, सुस्थितीतील वसाहतीत राहण्यासाठी कर्मचारी चातकासारखी प्रतिक्षा करीत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बांधकाम पूर्णत्वासाठी १५ लाखांची गरजग्रामीण रुग्णालयाची वसाहत इमारत पूर्णत्वास नेण्याकरिता १५ लाख रुपयांची गरज आहे. एखाद्या तरी लोकप्रतिनिधीने आपल्या निधीतून खर्ची घालून तालुकावासीयांसाठी व अधिकाºयांसाठी बांधकामासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.