शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

लाखोरी येथील दवाखाना कुलूप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

कावळे यांची बदली झाल्यापासून रुग्णालयास कुलूप लावलेला आहे. त्याचप्रमाणे येथील परिचारिका अश्विनी बांते यांची बदली मोहदुरा येथे करण्यात आली. एएनएम काचन चौधरी व परिचर जयदेव ढोके यांची बदली सालेभाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे लाखोरी, आलेसुर, मासलमेटा, खेडेपार, बोरगाव आदी गावातील दहा हजार लोकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही.

ठळक मुद्देउपकेंद्रही रिकामे : चार महिन्यांपासून आरोग्यसेवा कोलमडली

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील लाखोरी येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखाना मागील चार महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. तसेच उपकेंद्र बंद असल्याने सर्वसामान्य रुग्ण तसेच प्रसुतीची सुविधा नसल्याने महिला रूग्णांचे हाल होत आहे. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाल्यामुळे लाखोरी येथील आरोग्यसेवा कोलमडली आहे.लाखोरी आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकिय अधिकारी जयंत कावळे यांची बदली बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. कावळे यांची बदली झाल्यापासून रुग्णालयास कुलूप लावलेला आहे. त्याचप्रमाणे येथील परिचारिका अश्विनी बांते यांची बदली मोहदुरा येथे करण्यात आली. एएनएम काचन चौधरी व परिचर जयदेव ढोके यांची बदली सालेभाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे लाखोरी, आलेसुर, मासलमेटा, खेडेपार, बोरगाव आदी गावातील दहा हजार लोकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखाने येथील डॉक्टरांच्या अभावामुळे लाखनीतील ग्रामीण रुग्णालयावर बोझा पडतो आहे. आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे गरीब व गरजु रुग्णांचे तसेच गरोदर व स्तनदा माताचे हाल होत आहेत. गावातील अप्रशिक्षीत व बोगस पदव्या असलेल्या डॉक्टरांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागत आहे. रुग्णांच्या खासगी डॉक्टरांकडून आर्थिक लुट होत असते व औषधोपचारही योग्य होत नाही.लाखोरीचे डॉक्टर चांदेवार सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने जागा भरलेली नाही. डेप्युटेशनवर कावळे यांना पाठविण्यात आले होते. त्यांना परत बोलविण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता आहे. नवीन जागा भरण्यात येणार आहे. उपकेंद्राचे कर्मचारी कार्यरत आहेत.- डॉ. सुनील हटनागर, तालुका वैद्यकिय अधिकारी लाखनीशासनाकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांची पद भरण्याची मागणी केली आहे. सालेभाटा, लाखोरी, राजेगाव येथे डॉक्टरांची पद रिक्त आहे. सदर प्रश्नावर जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.- ज्ञानेश्वर रहांगडाले, जि.प. सदस्य लाखोरी क्षेत्र

टॅग्स :hospitalहॉस्पिटल