शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:06 IST

वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेद्वारे दिली असून कामगारांनी भ्रमीत होऊ नये, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देप्रकरण सर्वोच्च न्यायालयात : संघटनेची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेद्वारे दिली असून कामगारांनी भ्रमीत होऊ नये, असे आवाहन केले आहे.पूर्वीच्या वैनगंगा सहकारी साखर कारखान्यात २६० स्थायी व १५० अस्थायी कामगार कार्यरत होते. कारखाना डबघाईस आल्यावर त्यांचे वेतन थकीत झाले. स्टेट को आॅपरेटीव्ह बँक मुंबई शाखा नागपूर यांनी या कारखान्याला टाळे लावून नंतर विक्रीस काढले. कारखाना विक्री करताना बँकेने कामगारांचे थकीत वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयात मान्य केले होते. मात्र अल्प मोबदला देत असल्याने कामगार औद्योगिक न्यायालयात गेले. औद्योगिक न्यायालयाने कामगारांचे संपूर्ण थकीत वेतन देण्याचा निकाल दिला. त्यामुळे बँकेने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयानेही कामगारांच्या बाजूने निकाल देत बँकेला १३ कोटी ८९ लक्ष ८४ हजार ३३४ रुपये कामगारांना देण्याचा आदेश ३० आॅक्टोबर २०१५ रोजी दिला होता. मात्र स्टेट को आॅपरेटीव्ह बँक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपीलात गेली. बँकेला असे वाटले की साधारण कामगार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीला जाणार नाहीत, पण कामगार संघटनेकडून अ‍ॅड.सत्यजीत देसाई, अ‍ॅड.प्रकाश मेघे व लक्ष्मी मलेवार यांनी बाजू मांडण्याचे मान्य केले. सर्वोच्च न्यायालयात टेबल क्रमांक ११० वर प्रकरण क्रमांक ४३१४९/२००५ हे सुनावणीसाठी घेण्यात आले असून या प्रकरणावर सुनावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता असल्याने व निकाल कामगारांच्याच बाजूने लागेल, अशी माहिती वकीलांनी दिल्याने कामगारात आनंदाचे वातावरण आहे.कारखान्याचे व बँकेशी हितगुज असलेले काही कर्मचारी व कामगार खोट्या बातम्या पसरवित असून कामगारांना तडजोड करण्यास सांगत आहेत. कामगारांना त्यांच्या घामाचा पूर्ण मोबदला मिळणार असून कामगारांनी खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये तसेच न्यायालयाच्या खर्चासाठी लागणारी वर्गणी मजदूर संघाच्या पदाधिकाºयांकडेच जमा करावी असे आवाहन करण्यात आले.मोहाडी येथे आयोजित पत्रपरिषदेला भोजराम पारधी, टी.आर. गायधने, रामदास साठवणे, पी.एफ. बावनकर, कृष्णराव बारापात्रे, मनोहर गायधने, एस.पी. सव्वालाखे, अरुण हुड, मधुसूदन पाहुणे, राजू कारेमोरे, आर.व्ही. बांते, पी.सी. गौतम, शिवशंकर पेठेकर, गोलकुदास हेडाऊ, मनोहर पटले, झिबल लाळे, दयाराम नखाते, धनराज काटेखाये, संजय भवसागर, सुभाष यादव उपस्थित होते.