शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिजाऊ मानून स्त्रीचा सन्मान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:27 IST

भारतात स्त्रीला देवीचे रूप मानून तिच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली जाते. परंतु जिवंत स्त्रीवर बलात्कार केला जातो, हे पुरूषी म्हणून घेणाऱ्यांकरिता लांच्छनास्पद आहे.

ठळक मुद्देपुरूषोत्तम खेडेकर : मराठा सेवा संघाचा जनसंवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतात स्त्रीला देवीचे रूप मानून तिच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली जाते. परंतु जिवंत स्त्रीवर बलात्कार केला जातो, हे पुरूषी म्हणून घेणाऱ्यांकरिता लांच्छनास्पद आहे. प्रत्येक स्त्री ही आई आहे म्हणून प्रत्येक पुरूषाने आपल्या घरातील स्त्रीसह सर्व स्त्रियांना जिजाऊ मानून तिचा सन्मान करणे आवश्यक आहे. तेव्हाच आमचा पुरूषी अहंकार नष्ट होऊ शकतो, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले.विदर्भात मराठा सेवा संघाचा जनसंवाद कार्यक्रम सुरू आहे. त्याअनुषंगाने पुरूषोत्तम खेडेकर हे भंडारा जिल्ह्यात आले असता त्यांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी सिंदखेडराजा जिजाऊ सृष्टीचे संचालक अरविंद गावंडे, जिल्हा कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, दिलीप चौधरी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल भुसारी उपस्थित होते.यावेळी तरकसे म्हणाले, मनरेगा ही योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी कशी फायद्याची आहे, असे सांगून शासनाद्वारे राबविण्यात येणाºया योजनांची माहिती दिली. जिजाऊ सृष्टीचे संचालक अरविंद गावंडे यांनी सिंदखेडराजा येथे निर्माण करण्यात येणाºया जिजाऊ सृष्टीची माहिती देऊन मातृतिर्थाचे महत्त्व सांगून जिजाऊ सृष्टीकरिता आर्थिक मदतीचे आवाहन केले. दिलीप चौधरी म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळातीळ शाळा व आजच्या काळातील शाळा एकच आहेत, या आधुनिक शाळांना शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारानेच संपवून सर्वसामान्य लोकांच्या मनातील स्वराज्य निर्माण करता येऊ शकते.याप्रसंगी प्रस्ताविकातून अनिल भुसारी यांनी मराठा सेवा संघाची भूमिका विषद केली. कार्यक्रमाची सुरूवात केदार नाकाडे यांनी जिजाऊ वंदना गाऊन केली. संचालन तालुकाध्यक्ष चंद्रकांत लांजेवार यांनी तर आभारप्रदर्शन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी यशवंत भोयर, भगवान बाभरे, दत्ता हातेकर, रूपेश पानतावणे, पंकज घाटे, विक्रम कांबळी, सुदाम बोरकर, जयशंकर मने, गणेश नंदांवर, राजु चामट, अनिल झंझाड, श्याम कोसरे, प्रतिमा लांडगे, अंजली लांजेवार, सीमा उताणे, कल्पना चामट, विजय बालपांडे, आशिष ठाकरे, विश्वास बडवाईक, मंगेश राऊत, दिनेश बालपांडे, मंगेश राऊत यांच्यासह मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.