शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता मुलांसह मिळणार आईला बँक खात्यात सन्मान

By admin | Updated: March 25, 2017 00:35 IST

शिक्षण क्षेत्रातील अनेक दस्ताऐवजावर प्राधान्याने आईला सन्मान मिळू लागला आहे. या सन्मानातून आईचे महत्व आभाळासम असल्याचे दिसून येते.

गणवेश लाभ बँक खात्यात : सत्रारंभी गणवेश वितरणमोहाडी : शिक्षण क्षेत्रातील अनेक दस्ताऐवजावर प्राधान्याने आईला सन्मान मिळू लागला आहे. या सन्मानातून आईचे महत्व आभाळासम असल्याचे दिसून येते. आता आणखी या सन्मानात भर पडली आहे. पुढील सत्रापासुन गणवेश लाभाचे हस्तांतरण थेट बँक खात्यात होणार आहे. यासाठी बँक खाती आई व मुल यांच्या नावे संयुक्तपणे उघडली जावी अशा सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आईला सन्मान देणे सुरु केले आहे. शाळेच्या जनरल रजिस्टरवर आईचा नाव नोंदविणे आवश्यक करण्यात आले आहे. दहावी, बारावीचा निकाल बघायचा असेल तर आईचा नाव घातल्याशिवाय संगणकावर निकाल येत नाही. शालांत परिक्षेची गुणपत्रिका, प्रमाणपत्रावर आईचे नाव मुद्रित केल्या जाते. आता शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे जावून विविध योजनेत विद्यार्थ्यांसह आईचे नाव जोडत आहे. यावर्षी पासून २०१७-१८ सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश योजनेच्या गणवेश लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक बचत खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधान्याने स्वत: पाल्य व त्यांच्या आईचे नावे संयुक्त बँक खाती उघडण्यात याव्यात असे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. आई हयात नसल्यास त्या विद्यार्थ्यांचे पालक, अभिभावक यांचे नावे संयुक्त बँक खाती उघडता येणार आहे. जनरल रजिस्टर, गुणपत्रिका यानंतर आता आईला मुलासोबत बँक खाते उघडण्यासाठी मान दिला गेला आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील सर्व प्रवर्गातील मुले यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियान २०१७-१८ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)५७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेशभंडारा जिल्ह्यातील ५७ हजार ४२५ विद्यार्थ्यांसाठी प्रति गणवेश २०० रुपये, या दराने दोन गणवेश संचाकरिता ४०० रुपये प्रति विद्यार्थी रोख रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. २८८ लाख ८४४ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यात भंडारा तालुक्यातील ४७९२ मुली, ३२४४ मुले, लाखांदूर मुली ४३८०, मुले २९५९, लाखनी मुली ३४५५, मुले २६१९, मोहाडी मुली ५६१०, मुले ४२२१, पवनी मुली ४५३९ मुले २६९५, साकोली मुली ३९९१ मुले ३३५८ व तुमसर तालुक्यासाठी ६३२८ मुली व ५२३४ मुले असे एकूण ५७४२५ लाभार्थी आहेत. मोफत गणवेश वितरणाची कार्यवाही शाळा सुरु होण्यापूर्वी करायची आहे. विद्यार्थ्यांचे आईसह राहणार संयुक्त खातेया योजनेच्या लाभासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे आईसह संयुक्त खाती नॅशनल बँक, ग्रामीण बँक अथवा पोस्टआॅफीसमध्ये बँक खाते उघडता येतील. सदर योजनेचा लाभार्थी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अनिवार्य आहे. गणवेशाचा रंग प्रकार याचा निर्णय शाळा व्यवस्थापन यांना राहिल. गणवेश योजनेचा निधी थेट संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होईल. गणवेश पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी स्वत: आपल्या पाल्यास दोन गणवेश संच खरेदी करुन, खरेदी केलेल्या पावत्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी वर्ग करायचा आहे. पुढील सत्रारंभ झाल्यापासून एका महिन्याच्या आत रोख स्वरुपात स्वत: पाल्य व त्याच्या आईच्या नावे बचत बँक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना करावयाची आहे. वडिलापेक्षा आईवर जास्त भरवसा केला जातो. आईला प्रत्येक ठिकाणी महत्व प्राप्त झाले आहे. पूर्वी आई पडद्याआड राहायची. ती आता पुढे येत आहे. मातासाठी ही परिवर्तनाची नांदी आहे.- तेजस्विनी देशमुख, केंद्रप्रमुख, मोहगाव देवी केंद्र मोहाडी.भविष्याचा वेध घेणारी आईच असते. आर्थिक नियोजन आईलाच छान जमते. शासनाने आईवर विश्वास ठेवला. या विश्वासाचा सन्मान माताना दिला गेला.- सुषमा ठवकर, पालक माता, जि.प शाळा कान्हळगाव/ सिरसोली.