शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिलेची सोन्याची चेन परत करून दाखविला प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:26 IST

होय, वरील शीर्षक वाचून दचकलात, वास्तव अशी घटना आहे. हातातली सोन्याची साखळी दाखवत, ताई ही साखळी तुमचीच आहे का? असे बोलून एका महिलेने ती साखळी ताईच्या हातात दिली. होय, आमचीच आहे, असे बोलून ताईचे हृदय भरून आले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आजही प्रामाणिकपणा जपणारी माणसं जीवंत आहे. याचा प्रत्यय देणारी नवलाई तसेच आदर्श प्रेरणा देणारी माणसं मोहाडी येथे दिसून आली.

ठळक मुद्देमोहाडी येथील घटना : गीता थोटे यांचे कौतुक, प्रामाणिकपणा जीवंत असल्याचा आला प्रत्यय

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : होय, वरील शीर्षक वाचून दचकलात, वास्तव अशी घटना आहे. हातातली सोन्याची साखळी दाखवत, ताई ही साखळी तुमचीच आहे का? असे बोलून एका महिलेने ती साखळी ताईच्या हातात दिली. होय, आमचीच आहे, असे बोलून ताईचे हृदय भरून आले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आजही प्रामाणिकपणा जपणारी माणसं जीवंत आहे. याचा प्रत्यय देणारी नवलाई तसेच आदर्श प्रेरणा देणारी माणसं मोहाडी येथे दिसून आली.आजही समाजात प्रामाणिक माणसे कमी नाहीत. याची प्रचिती डॉक्टर प्रशांत थोटे यांच्या मातोश्री गीता थोटे यांनी करून दिली. काल रस्त्यावर पडलेली सोन्याची साखळी तिने स्वत:कडे न ठेवता साखळी असणाºया मालकापर्यंत पोहचविण्याचे कौतुकास्पद तेवढेच प्रेरणादाई कार्य त्यांनी केले. क्षणभर एखादी वस्तू नजरेआड झाली तर तिच्यावर नजर ठेवणाºया वृत्तीची माणसे पावलोपावली बघायला मिळतात. साधा पेन अगदी रुमालही अलगद उचलणारी व्यक्ती दिसतात. त्या महिलेने सोन्याला किंमत न देता घरी जावून सोनसाखळी परत केली. घटना अशी की, नित्याप्रमाणे माया दिपटे दूध घरी आणण्यासाठी मांडेसर रस्त्यावर असलेल्या शेतावर गेल्या होत्या. परत येत असताना गळ्यातील साखळी रस्त्यावर पडली. घरी आल्यानंतर साखळी पडल्याची जाणीव झाली. अंधारात साखळी शोधायला नरेश दिपटे व त्यांची पत्नी माया दिपटे मांडेसर मार्गे गेले. सोन्याची साखळी नजरेत आली नाही. सकाळ झाली. पुन्हा पत्नीसह दिपटे दांपत्य शेताच्या वाटेने गेले. त्यांना पुन्हा निराशाच हाती आली. प्रात:काली चौंडेश्वरी मार्गाने नत्थू पिकलमुंडे व त्यांच्या मागोमाग गीता थोटे व इतर महिला सोबत होत्या. चालत असताना नत्थू पिकलमुंडे यांना सोनसाखळी दिसली. त्यांनी गीता थोटे यांना उचलायला सांगितले. गीताताई ती सोनसाखळी घेवून घरी आल्या. काही वेळानंतर त्या नातवांना शाळेत सोडण्यासाठी बसस्टॉपवर आल्या. मागल्या पावली मायाताई दिपटेही मुलाला शाळेत सोडण्यासाठी तिथे आल्या. बसला अवधी असल्याने त्या एकमेकांशी संवाद साधत होत्या. गीतातार्इंनी, तुम्ही सकाळी चौंडेश्वरी मार्गाने काही शोधत होते काय? असे विचारले. रात्री सोन्याची साखळी रस्त्यावर पडली, पण शोधूनही सापडली नाही. माझ्याकडे तुमची सोनसाखळी आहे. असे न सांगता रहस्य कायम ठेवत गीता थोटे घरी गेल्या. लागलीच सोनसाखळी घेवून दिपटे यांच्या घराकडे गेल्या दारातून गीतानी मायाला हाक मारली. मायातार्इंच्या हातात सोनसाखळी ठेवली. एकीला कष्टाची, श्रमाची मौल्यवान वस्तू परत केली. त्याचा समाधान तर दुसरीला मौल्यवान वस्तू घरी परत आली. प्रामाणिकपणा हा दुर्मिळ गुण बघण्याचा आनंद दोघांनी हसून व्यक्त केला.