शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा

By admin | Updated: April 21, 2016 00:28 IST

रेल्वे स्थानकावरील फलाटावर मद्यधुंद अवस्थेत अस्ताव्यस्त झोपलेल्या व्यक्तीच्या खिशात २६ हजार रुपये असल्याचे ...

देव्हाडी रेल्वे स्थानकातील घटना : २६ हजार रूपये परत केलेराहुल भुतांगे तुमसर रेल्वे स्थानकावरील फलाटावर मद्यधुंद अवस्थेत अस्ताव्यस्त झोपलेल्या व्यक्तीच्या खिशात २६ हजार रुपये असल्याचे गस्तीवर असलेल्या जवानाला दिसल्याने त्याने त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलावून त्याच्याकडे मिळालेली २६ हजार रुपयाची रोख रक्कम परत करून औदार्य दाखविले.रात्री ८.३० च्या सुमारास गोंदिया मेमो ट्रेन तुमसर रोड देव्हाडी रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर तुमसर रोड रेल्वे पोलीस चौकीचे अमर ढबाले नामक जवान प्लेट फार्म नं. २ वर गस्त घालत असताना अंधाराच्या आडोशाला एक ३५ वर्षीय इसम दारुच्या नशेत झोपलेला दिसला. त्या इसमाला त्याने उठविण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु तो काहीच हालचाल करीत नसल्याने ढबाले यांनी त्या इसमाचे खिसे तपासले. त्याच्याकडे एकूण २६ हजार ५४० रुपये रोख होते व मोबाईलही दिसताच ढबाले यांनी त्या इसमाच्या नातेवाईकांना त्याच्या नंबरने फोन करून देव्हाडी रेल्वे स्थानकावर लगेच निघून या असा संदेश दिला. इसमाच्या नातेवाईक नामे बाबूलाल नरमद लिल्हारे (४५) रा. टेमनी (जि.बालाघाट) हा व त्याचे सहकारी तथा भौरगण पंचायत समितीचे सभापती प्रकाश चुन्नीलाल उके यांनी त्याच रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तुमसर रोड (देव्हाडी) रेल्वे स्थानक गाठले. तिथे तेजलाल हरपाल लिल्हारे (३५) रा.भोरगड हा नशेत झोपलेल्या अवस्थेत दिसला. नातेवाईकांनी त्याला उठविण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तो उठत नसल्यामुळे त्याच अवस्थेत त्याला घेून जाण्याचा निर्णय घेतला. तेजपाल लिल्हारेच्या खिशात मिळालेली रक्कम व मोबाईल तेजपालच्या नातेवाईकांना देताच तेजपालच्या नातेवाईकांचे डोळे पाणावले. आजच्या काळात एकीकडे पैशासाठी मारामारी प्रसंगी हत्याही केली जाते ; मात्र अमर ढबाले या पोलीस शिपायाने प्रामाणिकपणा दाखवून माणुसकीचा परिचय करून दिला आहे.