शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकपणा आजही कायम

By admin | Updated: July 11, 2015 01:39 IST

जगात ईमानदारी सारखा मोठेपणा नाही आणि बेईमानी सारखा दुष्कर्म नाही. ईमानदारीमुळे मनुष्य सर्वांचेच विश्वास संपादन करतो ...

रोखपालाने मानले आभार : बँकेने दिलेले ६० हजार केले परतभंडारा : जगात ईमानदारी सारखा मोठेपणा नाही आणि बेईमानी सारखा दुष्कर्म नाही. ईमानदारीमुळे मनुष्य सर्वांचेच विश्वास संपादन करतो व समाजात आदर्श स्थान मिळवितो. असाच आदर्श सनफ्लॅग कंपनीतील एक कर्मचाऱ्याने समाजापुढे घालून दिला आहे.गंभीरसिंह यदुवंशी हे वरठी येथील सनफ्लॅग स्टील कंपनीत कार्यरत आहेत. त्यांचे वेतन कॅनरा बँकेत जमा होते. दि. ८ जुलै रोजी यदुवंशी हे सकाळी भंडारा शहरातील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढायला गेले असता काही तांत्रिक कारणामुळे पैसे निघाले नाहीत. त्यानंतर ते घरी जाऊन कॅनरा बँकेचा धनादेश घेऊन बँकेत गेले. त्यांनी तिथून १६ हजार रुपयांचे धनादेश दिला. परंतु तेथील बँक रोखपालाने त्यांना १६ हजार रुपयाऐवजी शंभर रुपयांची एक आणि पाचशे रुपयांची एक बंडल असे एकूण ६० हजार रुपये दिले. मुलांची प्रकृती अस्वस्थ असल्याने यदुवंशी हे कॅनरा बँकेतून घेतलेले पैसे न मोजता भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यासाठी गेले. तिथे त्यांना १६ हजार रुपयांऐवजी ६० हजार मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर ६० हजाराची रक्कम घेऊन ते कॅनरा बँकेत पोहोचले. तेथील बँकेच्या कर्मचाऱ्यासमोर ६० हजार रुपयांची रक्कम परत करुन आपल्या खात्यातील केवळ सोळाच हजार रुपये घेतले. कॅनरा बँकेच्या रोखपालाच्या चुकीने यदुवंशी यांना तब्बल ४४ हजार रुपये जास्त मिळाले होते. परंतु, यदुवंशी यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी संपूर्ण रक्कम बँकेत परत करुन असा निष्काळजीपणा करु नका असा सल्ला दिला. यदुवंशी यांच्या मनात लोभ निर्माण झाला असता तर ४४ हजार रुपयांचा त्यांना लाभ झाला असता. जास्तीचे ४४ हजार रुपये बँकेत परत करुन प्रामाणिकपणाचे उदाहरण यदुवंशी यांनी दाखवून दिले. समाजाने त्यांचा आदर्श बाळगण्याची गरज आहे. त्यानंतर गंभीरसिंह यदुवंशी म्हणाले, एकदा कामावर असताना माझे तीन हजार रुपये हरविले होते. तेव्हा मी खूप दु:खी झालो होतो. पैसे हरविण्याचे दु:ख मला माहिती आहे. म्हणून मी स्वत: वेळ न दवडता बँकेतील जास्तीची रक्कम परत केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)