शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रशासनाची माघार; गृहकर कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:33 IST

वाढीव गृहकराच्या मुद्यावर संतापलेल्या भंडारेकरांसाठी थोडीफार गुडन्यूज आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेले गृहकर निश्चितपणे कमी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी दिली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांची पत्रपरिषदेत माहिती : करदात्यांना पुन्हा पाठविणार डिमांड

आॅनलाईन लोकमतभंडारा : वाढीव गृहकराच्या मुद्यावर संतापलेल्या भंडारेकरांसाठी थोडीफार गुडन्यूज आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेले गृहकर निश्चितपणे कमी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता पालिकेत आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.भंडारा नगरपालिका हद्दीत गृह व वाणिज्य इमारती मिळून एकुण २२ हजार ८०० करदाते आहेत. वर्षाकाठी पालिकेला कराच्या माध्यमातून ३ कोटी ३५ लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो. सन २०१७-१८ हे वर्ष करनिर्धारण पुनर्रचनेचे असल्यामुळे करदात्यांच्या घरांचे सर्व्हेक्षण करून वाढीव गृहकराची डिमांड पाठविण्यात आली होती. यात अव्वाचे सव्वा गृहकराचे बिल प्राप्त झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. काँग्रेससह विविध पक्ष व संघटनांनी पालिकेवर हल्लाबोल करीत आंदोलनाचाही इशारा दिला होता. खुद्द पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनीही भरसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. परिणामी यावर नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांनी विशेष सभा बोलाविण्याचे आश्वासन दिले होते.याबाबत मेंढे यांनी सांगितले की, २२ डिसेंबर रोजी पालिका सदस्यांची विशेष सभा घेऊन वाढीव गृहकराच्या बाबतीत नागरिकांमध्ये रोष असून त्यावर मार्ग काढण्यात आला. नागरिकांनी गृहकर कमी करण्यासाठी ३ हजार ७३३ अर्ज पालिकेत दाखल केले आहेत.यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच शहराची पाच झोनमध्ये उभारणी करण्यात आली असून सर्वच करधारकांची सरसकट फक्त १५ ते २० टक्केच गृहकर वाढ करण्यात येईल असे स्पष्ट मत नगराध्यक्ष यांनी व्यक्त केले. भाड्याने राहत असलेल्या व्यक्तींना मात्र नियमाप्रमाणे गृहकर द्यावे लागणार आहे. वाणिज्य जागेच्या वापराबाबतही रहिवासी गृहकराच्या दीडपट दर आकारले जाणार आहे. नववर्षाच्या प्रारंभीच वाढीव कर बिलाचे डिमांड नागरिकांना देण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला नगरपरिषद उपाध्यक्ष रुबी चढ्ढा, नगरसेवक नितीन धकाते, कर अधिकारी नागेश कपाटे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.सैनिकांना ५० टक्के कर सवलतनगरपालिका हद्दीत एखाद्या सैनिकाचे घर त्याच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे असल्यास गृहकरात ५० टक्के सवलत देण्यात येईल अशी माहितीही पत्रकार परिषदेत सुनिल मेंढे यांनी दिली. अशा बाबतीत सैनिकांना गृहकरात सुट देणारे भंडारा नगरपरिषद पहिली ठरणार असून याबाबतचा ठराव पालिकेच्या सभेत विचाराधीन असल्याचेही सांगण्यात आले.