शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

गृहभेट आपुलकीअंतर्गत ‘प्रशासन आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

नवेगावबांध : विशेष साहाय्य योजनेंतर्गत जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार ...

नवेगावबांध : विशेष साहाय्य योजनेंतर्गत जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज या मोहिमेंतर्गत भरून घेण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गकाळात प्रशासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचून माहिती देत आहे.

या उपक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी अपंग निवृत्तिवेतन या योजनेचे पात्र लाभार्थी तालुक्यात बऱ्याच प्रमाणात आहेत; परंतु या योजनेविषयी माहिती नाही किंवा ते खूप गरीब आहेत. सध्या कोरोनाकाळात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थी हे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा लाभार्थ्यांसाठी ‘प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलाठी कार्यालयांतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये ३ ते ८ मे या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. नवेगावबांध येथे ३ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गृहभेट आपुलकीची हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात संजय गांधी निराधार योजनेतील विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजता गावातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे ग्रामपंचायतीचे सरपंच अनिरुद्ध शहारे व तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी कळविले आहे.

दवंडीच्या माध्यमातून माहिती

तालुक्यातील २९ ग्रामपंचायत कार्यालयांत ३ ते ८ मे पर्यंत गृहभेट आपुलकीची ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावांतील लाभार्थ्यांना देण्यात यावी, यासाठी तलाठ्यांनी गावोगावी दवंडीद्वारे ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश अर्जुनी मोरगाव तहसीलदार विनोद मेश्राम यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना दिले आहेत.

अधिकाऱ्यांचे तयार केले पथक

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तहसील कार्यालयातील तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार के. एन. वाढई, भानारकर, मुनेश्वर गेडाम, मनीषा देशमुख व अव्वल कारकून आशा तागडे, लुचे, रीता गजभिये यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दिलेल्या निर्धारित तारखेला व वेळेला ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहणार आहे.

४३९ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

यापूर्वी जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान ही मोहीम तालुक्यात राबविण्यात आली होती. यावेळी लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन ४४९ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांतील पात्र ४३० लाभार्थ्यांचे अर्ज तत्काळ मंजूर करण्यात येऊन त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.