शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तालुका क्रीडा संकुल समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

आमगाव : तालुक्यातील किडंगीपार येथील क्रीडा संकुल सध्या केरकचरा घाणीच्या विळख्यात सापडले आहे. क्रीडा संकुल परिसरात सर्वत्र कचरा व ...

आमगाव : तालुक्यातील किडंगीपार येथील क्रीडा संकुल सध्या केरकचरा घाणीच्या विळख्यात सापडले आहे. क्रीडा संकुल परिसरात सर्वत्र कचरा व गवत असून, पावसामुळे पाणी क्रीडा संकुलात पटांगणात साचत असल्याने पटांगणाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकंदरीत क्रीडा विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे क्रीडा संकुल समस्यांचे माहेरघर झाले आहे.

स्थानिक क्रीडा संकुल येथे आमगाव शहरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व क्रीडाप्रेमी येथे रोज फिरण्याकरिता व खेळण्याकरिता मोठ्या प्रमाणात येतात; पण क्रीडा संकुल हे विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. या ठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व दर्जेदार खेळाडू घडावे, यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून तालुका क्रीडा संकुल केले; परंतु या क्रीडा संकुलाच्या पटांगणापासून तर संकुल समस्यांनी विळखा घातला आहे. खेळाडूंना साधी सायकलसुद्धा आतमध्ये नेता येत नाही. अनेक खेळाडू पाय घसरून पडलेले आहेत. पटांगणात साप, विंचू यांची भीती व्यक्त केली जात आहे.

साहित्य चोरीला जाण्याची शक्यता

संकुलच्या आत सुरुवातीला लोखंडी प्रवेशद्वार गंजलेला असल्याने त्याला कुलूपसु्द्धा लावता येत नाही. त्यामुळे साहित्य चोरीची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे भिंतीना ओलावा येत असून, काही भिंतीवरून पाणी गळत आहे. बोअरवेलवर लावण्यात आलेले विद्युत पंप बंद असल्याने पाण्याच्या समस्येमुळे प्रसाधनगृहात घाण साचलेली आहे. वरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये स्लॅबवर अनेक ठिकाणी गड्डे पडलेले आहेत. जिममधील अनेक साहित्य निकामी पडून आहेत. काही नवीन साहित्य धूळ खात आहेत.

कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

येथे मानधन तत्त्वावर ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचेही या क्रीडा संकुलाकडे लक्ष नाही. इथे खेळायला येणाऱ्या खेळाडूंनी व काही नागरिकांनी क्रीडा अधिकारी यांना निवेदन देऊनही एक दीड वर्षापासून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या संकुलाला एकदाही भेट दिली नसल्याचे सांगितले आहे.