शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

संतप्त शिक्षकांकडून शासन निर्णयाची होळी

By admin | Updated: September 21, 2016 00:29 IST

राज्य शासनाने काही दिवसापूर्वी विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले.

भंडारा : राज्य शासनाने काही दिवसापूर्वी विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. हे अनुदान शंभर टक्के घोषित करावे या मागणीसाठी आज भंडारा जिल्हा विनाअनुदानित कृती समितीने जिल्हा परिषद येथे राज्य शासनाचा अध्यादेश जाळून निषेध केला. मागील अनेक वर्षांपासून खासगी संस्था चालकांच्या शैक्षणिक संस्थामध्ये शेकडो शिक्षक रोजी-रोटी मिळेल या अपेक्षेने शिक्षक म्हणून तुटपूंजा मानधनावर काम करीत आहे. मात्र वर्षामागून वर्ष उलटून जात असतानाही या शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. यासाठी शिक्षक संघटना, संस्था चालकांनी शासन दरबारी अनेकदा रेटा मारला. राज्य शासनाने १९ सप्टेंबरला पारित केलेल्या निर्णया जाचक अटी असल्याचा आरोप या कृती समितीने केला आहे. २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय चुकीचा असून तो शिक्षकांसाठी कर्दनकाळ असल्याचा आरोपही समितीकडून केल्या जात आहे. २० टक्के अनुदानाऐवजी सर्वच शाळांना सरसकट १०० टक्के अनुदान घोषित करून शिक्षकांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान (कायम) विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष प्रविण गजभिये, सचिव मुकूंद पारधी यांच्यासह संतप्त शिक्षकांनी २० टक्के अनुदानाचा शासन निर्णय जाळून निषेध केला. (शहर प्रतिनिधी)