शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर रेल्वेस्थानकात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:32 IST

मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील तुमसर रोड रेल्वेस्थानक स्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ओळख आहे. परंतु येथे भटक्या कुत्र्यांचा ठिय्या पाहावयास मिळते. रेल्वे स्थानकात कुत्र्यांची टोळी फिरताना दिसते. दररोज शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांना धोका : बंदोबस्ताची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील तुमसर रोड रेल्वेस्थानक स्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ओळख आहे. परंतु येथे भटक्या कुत्र्यांचा ठिय्या पाहावयास मिळते. रेल्वे स्थानकात कुत्र्यांची टोळी फिरताना दिसते. दररोज शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.सध्या देशात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. दक्षिण पूर्व रेल्वेने नागपूर विभागात सदर अभियान यशस्वी राबविले आहे. तुमसर रोड रेल्वे स्थानकाचा समावेश स्वच्छ रेल्वे स्थानकात आहे, परंतु मागील काही महिन्यापासून या रेल्वेस्थानकात बेवारस कुत्र्यांची टोळी फिरताना दिसते. कुत्र्यांच्या टोळीने येथे भय निर्माण झाले आहे. विशेषत: लहान मुले, महिलांच्या जीवाला धोक्याची शक्यता येथे बळावली आहे.कुत्र्यांची टोळी बिनधास्त रेल्वेस्थानकात फिरताना दिसते. पावसाळ्यात कुत्र्यांपासून धोक्याची शक्यता अधिक असते. स्टेशन अधीक्षक कार्यालयासमोरून कुत्र्यांची टोळी मोठ्या ऐटीत फिरत असल्याची चित्रफित एका प्रवाशाने 'लोकमत'ला दिली. येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी कुत्र्याच्या टोळीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.कुत्र्यांची टोळी रेल्वेस्थानकात एकमेकांवर भुंकणे, आरडाओरड करणे, पाठलाग करणे आदी त्यांच्या क्रिया सुरूच राहतात. प्रवाशी गाडी येण्याच्या वेळेस प्रवाशांना या टोळीचा मोठा त्रास जाणवतो. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी कुत्र्यांच्या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.