शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक सिध्दार्थ वसतिगृहाला आग

By admin | Updated: May 25, 2016 01:14 IST

दीडशे वर्षापूर्वीची कौलारु इमारत दूपारी ४.१५ वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीत जळुन खाक झाली.

दीडशे वर्षांची इमारत : ५० लाखांचे नुकसान, नगरपालिकेचे अग्निशमन वाहन कुचकामी, नागरिकांनी दाखविली समयसुचकतापवनी : दीडशे वर्षापूर्वीची कौलारु इमारत दूपारी ४.१५ वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीत जळुन खाक झाली. आग लागल्यानंतर नागरिकांनी समयसुचकता दाखवित आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती.नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे पर्यत्न करून नगर पालिका, पोलीस स्टेशन व भंडारा पोलीस मुख्यालयाला तातडीने कळविले. परंतु पाण्याचे टँकर पोहचण्यापूर्वी आधिकाधिक इमारत जळुन खाक झालेली होती. प्रशिक्षि२त वाहनचालकाची नियुक्ती न झाल्याने पालिकेचे अग्नीशमन वाहन पंधरा दिवसात दुसऱ्यांदा कूचकामी ठरले.२२ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी स्वतंत्र्य संग्राम सैनिक दलीतमित्र मन्साराम राऊत यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात वसतीगृह सुरु केले. तीच इमारत आगीत जळून खाक झाली. इमारतीमध्ये भारत सेवक सिध्दार्थ वसतीगृह, श्री संताजी वसतीगृह व धम्मचक्र कन्या वसतीगृह या तिनही वसतीगृहाचे रेकार्ड, तिनही वसतीगृहासाठी विद्यार्थी-विद्याथींच्या गाद्या, ग्रंथालयाची पुस्तके, टीव्ही, दोन कॉम्प्युटर, इन्व्हर्टर, बॅटरी व अन्य महत्वाच्या वस्तू तसेच विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणारे लाकडी बेंच अशा सर्व वस्तू जळून खाक झाल्या. वसतीगृह संस्थेचे सचिव विकास राऊत हे कुटूंबासह भंडारा येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, धर्मेंद्र नंदरधने, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, मोहन पंचभाई, जिल्हा मत्स्य व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, राम भेंडारकर, पोलीस निरीक्षक खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गहादे व वॉर्डातील नागरिकांनी तात्काळ वसतीगृह परिसर गाठले. त्यांनी आगीवर नियंत्रणासाठी कसोसीने प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले. सायंकाळी ६ वाजता भंडारा येथून अग्नीशमन वाहन पोहचले व वसतीगृह इमारतीची आग विझविण्याचे प्रयत्न झाले. नगरपरिषद, दुग्ध उत्पादक संघ व भंडाराचे अग्नीशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. परंतु सागवनी लाकूड असलेली इमारत व सर्व साहित्य असे साधारणत: ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्नीशमन वाहनासाठी चालक व अन्य कर्मचारी नियुक्तीचे अधिकार न दिल्याने पंधरवाड्यात दोन घरे जळुन खाक झाली. (तालुकाा प्रतिनिधी)