शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सोरणा येथे इसमाचा खून

By admin | Updated: May 26, 2015 00:33 IST

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या आरोपावरुन एका इसमाने दोन मित्रांच्या सोबतीने इसमाची तलवारीने वार

तीन आरोपींना अटक : पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नहरात फेकलाआंधळगाव : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या आरोपावरुन एका इसमाने दोन मित्रांच्या सोबतीने इसमाची तलवारीने वार करुन खून केल्याचा प्रकार सोमवारला उघडकीस आला. ही घटना पांगडी जंगलात बावनथडी ते अंबागड नहरात रविवारला घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मत्सा सकरु राठोड (५५) रा. सोरणा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी देवराम राजाराम धुर्वे (३५) रा.सोरणा, दिनेश नारायण कोडवते (२३) रा.पांगडी, शिशुपाल दयाराम पुसाम (२५) रा.लंजेरा या तीन आरोपींना अटक केली आहे. मोहाडी तालुक्यातील सोरणा येथील मत्सा राठोड याला गुप्तधन शोधण्याचा छंद होता. त्यातच त्याची देवराम धुर्वे याच्याशी ओळख झाली होती. देवरामची पत्नी पायाळू असल्यामुळे या तिघानी मिळून गुप्तधन शोधण्याचा बेत आखला. दरम्यान, देवरामची पत्नी व मत्सा यांच्यात जवळीकता निर्माण झाल्याचा संशय देवरामला आला. त्यानंतर त्याने मत्साचा काटा काढण्याचा बेत आखला. ही बाब देवरामच्या पत्नीने मत्सा राठोडला सांगितली. त्यानंतर अडथळा दूर करण्यासाठी देवरामला मारण्याचा बेत आखला. दरम्यान, मत्सा हा १९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पांगळी येथे जावून येतो, असे सांगून घरुन निघाला. मात्र रात्र होऊनही तो घरी न परतल्याने मत्साचा मुलगा जयकिशोर राठोड याने आंधळगाव पोलिसात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन त्यांनी देवरामला ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखविताच त्याने मत्सा व आपल्या पत्नीचे संबंध असल्यामुळे तलवारीने गळा चिरुन खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी यात कोण कोण सहभागी होते. कुठे खून केला याबाबत शोध घेतला असता, देवरामने मत्साच्या मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करुन मृतदेह बावनथडी नहरात फेकल्याचे सांगितले. यासाठी दिनेश कोडवते, शिशुपाल पुसाम या मित्रांची मदत घेतल्याचे बयानात सांगितले.त्यानंतर तिघांविरूद्ध भादंवि ३०२ (खून करणे), २०१ (पुरावा नष्ट करणे), १२० (ब) ३४ कलमान्वये गुन्हे नोंदवून अटक केली. या घटनेचा तपास तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात आंधळगावचे ठाणेदार मनोज काळबांधे, हवालदार सोळंकी, साकुरे, सिंगाडे करीत आहेत. (वार्ताहर)