शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हिरकणी कक्ष ठरतोय कुचकामी

By admin | Updated: December 30, 2014 23:27 IST

बसस्थानकावर बाळांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते, ही बाब हेरून राज्य शासनाने बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या स्तनपानासाठी

भंडारा : बसस्थानकावर बाळांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते, ही बाब हेरून राज्य शासनाने बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या स्तनपानासाठी सुविधा करून देण्यात आलेली आहे. परंतु बसस्थानकावर असे कक्ष आहे, याची जनजागृती न झाल्यामुळे महिला प्लॉटफार्मवरच स्तनपान करीत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले. भंडारासह जिल्ह्यातील विविध बसस्थानकावर महिला, पुरूष प्रवाशांची दिवसभर गर्दी असते. अशावेळी चिमुकल्यांना स्तनपान करताना महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. भूक लागताच ही चिमुरडी रडायला लागतात, यामुळे नाईलाजाने का होईना सर्वांच्या नजरा वाचिवत महिलांना पदराआड मुलांना स्तनपान करावे लागते. अशावेळी चोरट्या जनरेने त्यांच्याकडे पाहणारेही महाभाग असतात. ही बाब हेरून राज्य शासनाने हिरकणी कक्षची स्थापना केली. कक्ष तयार करताना मात्र त्याबाबत जनजागृती करण्याचा विसर एसटी महामंडळाला पडल्याचे दिसून येत आहे. बसथानकावर ही सुविधा असताना म२िहला उघड्यावर स्तनपान करताना दिसून येतात. भंडारा बसस्थानकावर फेरफटका मारला असता प्रवाशांना बसण्याकरिता असलेल्या बाकांवर महिला मुलांना स्तनपान करीत असल्याचे आढळून आले. त्यांना हिरकणी कक्षात मुलांना स्तनपान करण्याची सोय आहे, तिथे का जात नाही, असे विचारले असता हिरकणी कक्ष म्हणजे काय? हेच बहुतेक महिलांना माहिती नसल्याचे समोर आले. शासनाने मातांकरिता हिरकणी कक्षाची निर्मिती केली. परंतु त्यासंदर्भात जनजागृती नसल्याने महिलांना त्याचा उपयोग करीत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे बसस्थानकावर या कक्षाची माहिती होण्याकरिता ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)