शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाची झाली दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:30 IST

वर्षभरापासून मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. एकेरी मार्गही येथे पूर्ण झाले नाही. त्याचा फटका आता वाहतुकधारांना सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला रस्ता चिखलमय झाला आहे. जडवाहनामध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसानंतर या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.

ठळक मुद्देतुमसर-गोंदिया-मनसर रस्ता : जड वाहनेही घसरतात चिखलाने

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वर्षभरापासून मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. एकेरी मार्गही येथे पूर्ण झाले नाही. त्याचा फटका आता वाहतुकधारांना सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला रस्ता चिखलमय झाला आहे. जडवाहनामध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसानंतर या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय मार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. पाऊस पडल्यानंतर रस्ता चिखलमय झाला आहे. त्यावरून जड वाहने सुद्धा घसरत आहेत. दुचाकी तर चालविणे अत्यंत धोकादायक झाले आहे. रस्ता रूंदीकरण, मातीमिश्रीत मुरूम, तर कुठे मातीचा भराव करण्यात आला. पावसानंतर ते मातीचे चिखलात रूपांतर झाले आहे.एक वर्षापासून रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्ता रूंदीच्या व सिमेंट काँक्रीटकरणाला एका वर्षापुर्वी सुरूवात झाली होती. एक ते दीड वर्षात सदर रस्ता तयार होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पॅचेस पूर्ण करणे गरजेचे होते.राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. सदर रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने वाहनधारकांना येथूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.लहान पुलाचे बांधकाम धोकादायकराष्ट्रीय महामार्गावर लहान मोठे अनेक पूल असून त्यांचे बांधकाम सुरूच आहे. रपटा व नाल्यावरील पूल मोठा असल्याने पावसात पोचमार्ग पाण्याखाली जात आहे. त्यामुळे रस्ता या पावसाळ्यात बंद झाला होता. महामार्ग प्राधीकरणाने सर्वात प्रथम पूलाचे बांधकाम पूर्णची गरज आहे.