शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाजार लिलावात सर्वाधिक रक्कम

By admin | Updated: March 25, 2017 00:39 IST

सन २०१७-१८ या वर्षाकरिता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.

सुविधांचा मात्र अभाव : नगरपंचायतला मिळणार १०.७० लाख रूपयांचे उत्पन्नदेवरी : सन २०१७-१८ या वर्षाकरिता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. ही रक्कम यापूर्वी मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा पाचपटींनी जास्त आहे. याकरिता नगरपंचायतमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. सर्वाधिक बोली बोलून आठवडी बाजार मिळविण्यात माजी सरपंच जैपाल शहारे यांनी हा लिलाव जिंकला. त्यामुळे आता आठवडी बाजाराची वसुली शहारे करतील. मागील ठेकेदारापासून दुकानदाराना होणारा त्रास बघता भाजी व्यवसायिक असलेले जैपाल शहारे यांनी बाजार मिळविला. याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. मागील १५ दिवसापूर्वी न.पं.चे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी आठवडी बाजाराची पाहणी केली व दुकानदारांना सर्व बाबीची विचारपूस केली. त्यावेळी ठेकेदाराकडून जास्त रुपयांची वसुली व्यावसायीकांकडून होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नगराच्या बाजारात अनेक समस्या आहेत. काही ठिकाणी ओटे बनविण्यात आले परंतु या ओट्यावर शेड नसल्याने दुकानदारांना ऊन व पावसाचा त्रास सहन करावा लागतो. दुकानदारांनी सुविधा पुरविण्याबाबत नगरपंचायतला कळविले. परंतु त्यांच्या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष होत असल्याने आतातरी मुख्याधिकारी याकडे लक्ष देऊन दुकानदारांना सुविधा प्रदान करणारा काय? असा सवाल केला जात आहे. मोठा आठवडी बाजार म्हणून देवरी बाजाराची ओळख आहे. गोंदिया, आमगाव, साकोलीचे व्यापारी येतात. अतिक्रमणामुळे जागा जरी कमी शिल्लक असला तरी शेकडो लहान मोठी दुकाने लागत असतात. परंतु सुविधा मिळत नसल्याने व बाजारात ठेकेदाराला जास्त पैसे द्यावे लागत असल्याने व्यापारी नाराज आहे. (तालुका प्रतिनिधी)आतातरी सुविधा द्यायावर्षी नगरपंचायतला १० लक्ष रुपयांच्यावर उत्पन्न मिळत असले तरी या आठवडी बाजारात मुलभूत सुविधा आतातरी मिळणार काय? असा संतप्त प्रश्न केला जात आहे. पिण्याचे पाणी, शौचालय, रस्ते व वीज या प्रमुख सुविधा मिळत नसल्याने व्यापाऱ्यामध्ये नगर पंचायतविरूध्द असंतोष बघायला मिळतो. शौचालय व पिण्याच्या पाण्याची टाकी काही वर्षापूर्वी आठवडी बाजारात बांधण्यात आली. परंतु त्याला आतापर्यंत कुलूपच लावून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारी सोडून व्यापाऱ्यांना इतरत्र दूर अंतरावर भटकावे लागते. याचा सर्वाधिक त्रास स्त्रीवर्गाला होत असतो.