शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सीटी-1 वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची उच्चस्तरीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 23:47 IST

सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. इंदोरा आणि कन्हाळगाव जंगलात आठवडाभरात दोघांना ठार केले. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी १५ दिवसांपासून जंगलात तळ ठोकून आहेत. मात्र, हा वाघ हुलकावणी देत आहे. दुसरीकडे वाघाचे हल्ले वाढल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन जिल्ह्यांत १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला कोणत्याही परिस्थितीत जेरबंद करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या उपस्थितीत मंगळवारी नागपूर येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे जंगलात तीन पथक तळ ठोकून असून वाघाच्या मार्गावर पाच मचान आणि ६१ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. इंदोरा आणि कन्हाळगाव जंगलात आठवडाभरात दोघांना ठार केले. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी १५ दिवसांपासून जंगलात तळ ठोकून आहेत. मात्र, हा वाघ हुलकावणी देत आहे. दुसरीकडे वाघाचे हल्ले वाढल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी नागपूर येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला वन्यजीव नागपूर पूर्वचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर आणि चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक, गडचिरोलीचे वनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांच्यासोबत भंडारा, गोंदिया, वडसा आणि ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक उपस्थित होते. या बैठकीत वाघाला कशा पद्धतीने जेरबंद करायचे यावर चर्चा करण्यात आली. वन्यजीव मानवी संघर्ष प्राण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान हा वाघ सध्या वडसा जंगलात असल्याची माहिती आहे. लाखांदूर तालुक्यात या वाघाचा संचार असल्याने त्याला पकडण्यासाठी स्थानिक वनविकास महामंडळाच्या पथकासह गोंदिया आणि भंडारा येथील जलद कृती दलाचे जवान जंगलात तळ ठोकून आहेत. हा वाघ ज्या मार्गावरून जातो त्या परिसरात पाच मचानी उभारण्यात आल्या असून त्यावर खडा पहारा आहे. तसेच ६१ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही हा वाघ हुलकावणी देत आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नियंत्रण अधिकारीसीटी-१ वाघ हा अत्यंत हुशार असून तो रात्रीच्याच वेळी बाहेर निघतो. त्यामुळे त्याला जेरबंद करणे कठीण जात आहे. वाघाला बेशुद्ध करुन पकडण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ दिवसांपूर्वीच दिली आहे. आता या वाघाला जेरबंद करण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून वन्यजीव पूर्व नागपूरचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

सीटी-१ वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात तैनात करण्यात आले आहेत. लवकरच या वाघाला जेरबंद करण्यात यश येईल. मात्र, लाखांदूर तालुक्यातील व वाघाचा संचार असलेल्या जंगल परिसरात नागरिकांनी जाऊ नये. तसेच रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर निघू नये.-राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा

 

टॅग्स :Tigerवाघ